अजित पवार महायुतीची साथ सोडणार? नवाब मलिक यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर महायुतीकडून अजित पावर यांच्यावर फोडण्यात आले. तसेच जागावाटपात सन्माजनक जागा मिळाल्या नाही तर वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असे वक्तव्य अजित पवार गटाने केले होते. महायुतीत अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत होत्या. आता अजित पवार गटाचे नेते नबाव मलिक यांनी केलेल्या दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजपकडून नवाब मलिक यांना उमदवारी देण्यास विरोध होत होता. तरीही मलिक अणुशक्तीनगरमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता त्यांनी काही महत्त्वाचे दावे केले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले ही चुकीची बाब आहे, असे ते म्हणाले. अजित पवार यांनी वैयक्तिकरित्या आपल्याला मदत केली, त्यामुळे आपण त्यांच्याबरोबर आलो आहोत. अजित पवार भाजपासोबत असले तरी त्यांनी त्यांची विचारधारा सोडलेली नाही, असे सांगत त्यांनी सूचक विधान केले.
राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. माझ्या उमेदवारीला अनेकांचा विरेध होता. तरीही त्यांनी उमेदवारी दिली. हे फक्त अजित पवारच करू शकतात. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीतचेच सरकार येईल,याची काहीही शाश्वती नाही. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाचेच सरकार येईल किंवा अजित पवार भाजपासोबतच असतील, हे आताच सांगणे कठीण आहे. या निकालानंतर कोण कोणाच्या बरोबर असेल हे सांगताच येत नाही, असे संकेतही त्यांनी दिली.
राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नाही आणि कुणीही कायमचा मित्र नाही. परिस्थिती बदलत राहते. शत्रू मित्र होतात, मित्र शत्रू होतात. निकालानंतरची परिस्थिती काय असेल सांगता येत नाही. परिस्थितीनुसार काहीही घडू शकते, असेही मलिक म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List