असं घडेल हे कधी वाटलं नव्हतं; पण चिंता करायची नाही, आता वेळ आली आहे; शरद पवार यांचा दिलीप वळसे-पाटलांना इशारा
याआधी आपण अनेकदा सत्तेत होतो. त्या वेळी आंबेगावच्या सहकाऱ्याला सातत्याने संधी दिली; पण ते दुसऱ्यांच्या पक्षाकडे गेले. त्यांना मंत्रीपद दिले, विश्वासाने जबाबदारी दिली. पण दुर्दैवाने गैरफायदा घेतला. असं घडेल हे कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण चिंता करायची नाही. आता वेळ आली आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना दिला.
आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील मविआचे उमेदवार देवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांसह गोविंद बाग येथे शरद पवार यांची भेट घेतली. त्या वेळी पवार बोलत होते.
याआधी सत्ता मिळाली तेव्हा आंबेगावच्या सहकाऱयाला त्यात आपण सामील केले. पण हा प्रतिनिधीच दुसऱ्या पक्षाकडे गेला. मी पेंद्रात होतो, त्यामुळे राज्यात लक्ष देणे शक्य नव्हते. परिणामी राज्याची जबाबदारी काही लोकांवर सोपवली. विश्वासाने जबाबदारी दिली, पण दुर्दैवाने त्यांनी वेगळा विचार केला. गैरफायदा घेतला. लोकांना स्वप्नातही वाटले नव्हते ते या लोकांकडून घडले. पण आंबेगावची जनता मात्र त्यांच्याबरोबर गेली नाही, असे शरद पवार म्हणाले.
मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा नामोल्लेख न करता पवार म्हणाले, त्यांच्या वडिलांनी मला सांगितले, माझा मुलगा मुंबईत शिकतोय, त्याला तुमच्या सोबत घेता आले तर घ्या. मी सहकाऱ्याच्या मुलाला सोबत घेतले. काही महत्त्वाच्या पदांवर संधी दिली. रयतसह वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटमध्ये घेतले. देशाच्या साखर कारखान्याचे अध्यक्ष पद दिले. पण त्यांनी वेगळा निर्णय घेतला. सत्ता कायम टिकत नसते. सत्तेपेक्षा सत्तेवर बसवणारा सामान्य माणूस महत्त्वाचा असतो. आता वेळ आली आहे. आंबेगावच्या जनतेवर माझा विश्वास आहे. त्यांनी जी भूमिका घेतली ती सामान्य माणसाला आवडली नाही. मुंबईत लोपं त्यांना म्हणतात तुम्हीसुद्धा? असे म्हणताच एकच हशा पिकला.
मिळालेले यश देशाला कळले पाहिजे
पवार म्हणाले, समोरच्या लोकांना तुम्ही काय करू शकता हे कळाले आहे. ते सत्ता, संपत्ती याचा वापर करत आहेत. तुम्ही फाटक्या खिशाचे आहात. पण निवडणुकीत चिकाटीने काम करा. नुसते यश मिळवायचे नाही तर मिळवलेले यश देशाला कळले पाहिजे, असे काम करा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List