Colaba Assembly Election : कुलाब्यात राहुल नार्वेकर यांच्या समोर कोणाचे आव्हान?

Colaba Assembly Election : कुलाब्यात राहुल नार्वेकर यांच्या समोर कोणाचे आव्हान?

Colaba Assembly constituency : कुलाबा विधानसभा मतदारसंघ हा मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. मुंबईतील हा महत्त्वाचा एक मतदारसंघ आहे. २००८ मध्ये केलल्या मतदारसंघांच्या रचनेनंतर त्याची निर्मिती झाली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत येथून भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांचा पराभव केला होता. राहुल नार्वेकर यांच्या आधी भाजपचे राज पुरोहित येथून आमदार होते.

यंदा राहुल नार्वेकर यांना या मतदारसंघातून पुन्हा संधी दिल्याने राज पुरोहित नाराज असल्याची चर्चा होती. राज पुरोहित यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांनी राज पुरोहित यांची नाराजी दूर केल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपला मुंबईतील पहिली बंडखोरी रोखण्यात यश आले आहे.

राज पुरोहित आणि राहुल नार्वेकर यांनी आज एकत्र पत्रकार परिषद घेतली आणि संभ्रम दूर केला. राहुल नार्वेकर म्हणाले की, ”ही निवडणूक राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांची आहे. आम्ही एकत्र येऊन ५० हजार मतांच्या फरकाने विजयी होऊ. भाजपाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न आहे.”

कुलाब्यातील राजकीय समीकरण?

कुलाबा विधानसभा मतदारसंघात भाजपा नेते राज पुरोहित यांचा आधीपासून चांगला दबदबा राहिलाय. २००९ मध्ये राज पुरोहित यांचा येथून पराभव झाला होता. पण २०१४ मध्ये त्यांनी विजय मिळवला आणि पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. २०१९ मध्ये राज पुरोहित यांचा पत्ता कापत भाजपने राहुल नार्वेकर यांना येथून उमेदवारी दिली होती. ज्यामध्ये ते विजयी झाले होते. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कुलाबा मतदारसंघातून विद्यामान आमदार ॲड. राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

२०१९ चा निकाल

उमेदवाराचे नाव पक्ष एकूण मतं
राहुल नार्वेकर भाजप 57,420
​​भाई जगताप काँग्रेस 41,225
जितेंद्र रामचंद्र कांबळे इतर 3,011

२०१४ चा निकाल

उमेदवाराचे नाव पक्ष एकूण मतं
राज के. पुरोहित भाजपा 52,608
पांडुरंग गणपत सकपाळ शिवसेना 28,821
ऍनी शेखर काँग्रेस 20,410

२००९ चा निकाल

उमेदवाराचे नाव पक्ष एकूण मतं
अन्नि शेखर काँग्रेस 39,779
राज के. पुरोहित भाजप 31,722
अरविंद ज्ञानेश्वर गवडे मनसे 22,756

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IPL 2025 – पाकिस्तानला टी-20 वर्ल्डकपमधून बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या गोलंदाजाची मेगा लिलावात एन्ट्री IPL 2025 – पाकिस्तानला टी-20 वर्ल्डकपमधून बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या गोलंदाजाची मेगा लिलावात एन्ट्री
टी-20 वर्ल्डकप 2024 मध्ये पाकिस्तानला पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळणाऱ्या अमेरिकेने धुळ चारली होती. परिणामी वर्ल्डकपमधून पाकिस्तानचा पत्ता साखळी फेरीतच कट झाला....
ही अभिनेत्री भारतीय नाही तर अमेरिकेची नागरिक, त्या पोस्टमुळे झाली पोलखोल
उडता पंजाबसारखी महाराष्ट्राची अवस्था होऊ देऊ नका, शिंदे भाजपाच्या चोरांच्या सरकारला घरी बसवा: मल्लिकार्जून खर्गे
‘सर्व औषधे मोफत, महाराष्ट्रातील जनतेला 25 लाखांचा विमा’, मल्लिकार्जुन खर्गे यांची मोठी घोषणा
शेतकऱ्यांचं किती लाखांचं कर्ज माफ करणार?; शरद पवार यांची महागॅरंटी काय?
महाविकास आघाडीकडून लाडक्या भावांना मोठं गिफ्ट, दर महिन्याला इतके हजार मिळणार, उद्धव ठाकरेंची घोषणा
जातीनिहाय जनगणना करू आणि 50 टक्के आरक्षणाची मर्यादा तोडू – राहुल गांधी