अभिषेक बच्चन याच्यापेक्षा ‘या’ गोष्टीमध्ये ऐश्वर्या राय आहे वरचढ, अभिनेत्रीने…
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे सातत्याने सांगितले जातंय. काही रिपोर्टमध्ये तर यांचा घटस्फोट झाल्याचा देखील दावा करण्यात आलाय. घटस्फोटाच्या चर्चांवर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीच काहीच भाष्य करत नाहीये. हेच नाही तर ऐश्वर्याने जलवा बंगला सोडल्याचेही सांगितले जातंय. अनंत अंबानीच्या लग्नातही ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबासोबत पोहोचली नव्हती. ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत पोहोचली होती.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न 20 एप्रिल 2024 रोजी झाले. काही वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लेकीचे नाव आराध्या असून आराध्या ही कायमच ऐश्वर्यासोबत विदेशात जाताना दिसते. आराध्या बच्चन ही आई ऐश्वर्यासोबतच आजीच्या घरी शिफ्ट झाल्याचा खुलासा काही रिपोर्टमध्ये करण्यात आलाय.
ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चन याच्यापेक्षा जास्त उच्चशिक्षित आहे. अभिषेक बच्चन याने मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले. यानंतर त्याने पदवीसाठी अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात प्रवेश घेतला. मात्र शिक्षण अर्धवट सोडून अभिषेक बच्चन हा मुंबईला परतला. पदवीपर्यंत शिक्षण न घेताच अभिषेक याने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
ऐश्वर्या राय हिने आपले शिक्षण मुंबईतून केले. ऐश्वर्याचे प्राथमिक शिक्षण आर्य विद्या मंदिर हायस्कूलमधून झाले आणि पुढे जय हिंद महाविद्यालयातून इंटरमिजिएट केले. ऐश्वर्याने आर्किटेक्चरमध्ये करिअर करण्यासाठी ॲकॅडमी ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रवेश घेतला. परंतू तिने पुढे मॉडेलिंग करण्यास सुरूवात केली.
अभिषेक बच्चन याला डेट करण्याच्या अगोदर ऐश्वर्या राय ही सलमान खानला डेट करत होती. मात्र, एका वाईट वळणावर त्यांचे ब्रेकअप झाले. हेच नाही तर सलमान खानवर त्यावेळी अनेक गंभीर आरोपही करण्यात आले होते. सलमान खान आणि ऐश्वर्याची जोडी चित्रपटांमध्ये हीट ठरली. ऐश्वर्या ब्रेकअपनंतर आयुष्यात पुढे गेली. मात्र, सलमान खान याने अजूनही लग्न केले नाहीये.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List