Salman Khan Blackbuck case : त्या रात्री काय घडलं ? सलमान अडकलाय त्या काळवीट शिकार प्रकरणाची A to Z माहिती घ्या जाणून

Salman Khan Blackbuck case : त्या रात्री काय घडलं ? सलमान अडकलाय त्या काळवीट शिकार प्रकरणाची A to Z माहिती घ्या जाणून

Salman Khan and Lawrence Bishnoi Controversy : बॉलीवुड सुपरस्टार सलमान खानने त्याच्या तीन दशकांहून अधिक काळाच्या करिअरमधअये असंख्य चित्रपट करत प्रचंड नाव कमावलं. पण प्रसिद्धिसोबतच तो नेहमी वाद-विवादांतही सापडलेला दिसतो, त्याच्या अनेक कॉन्ट्रोव्हर्सीज आहेत. 1998 साली आलेल्या ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खान पहिल्यांदाच वादात सापडला. राजस्थानमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान चित्रपटाच्या कास्टसोबत काळवीटाची शिकार केल्याचा आरोप सलमानवर लावण्यात आला होता. FIR नुसार, त्याच्यावर वेगवेगळ्या दिवशी 3 काळवीट आणि 2 चिंकरा यांची शिकार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्याने शिक्षाही भोगली आहे. मात्र 26 वर्षांपूर्वीच हे प्रकरण आता पुन्हा चर्चेत आलं असून त्याचं नाव या केसमध्ये पुन्हा समोर आलं आहे. त्यामागचं कारण म्हणजे कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई. या कृत्याबद्दल ( काळवीट शिकार) सलमानने माफी मागितली पाहिजे अशी बिश्नोई समाजाची मागणी आहे. याच मुद्यावरून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई देखील सलमानच्या जीवावर उठला असून त्या2ने अनेकदा त्याला जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून त्याला या धमक्या मिळत आहेत. मात्र याचदरम्यान सलमानचा जवळचा मित्र असलेले, राजकारणी बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्याने या प्रकरणाने चांगलेच गंभीर वळण घेतले. या हत्याकांडानंतर
सलमानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली.

26 वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्या रात्री नेमकं असं काय घडलं? त्या प्रकरणातून सलमान अजूनही बाहेर का पडू शकत नाहीये?, ते सविस्तर जाणून घेऊया.

 हम साथ साथ है चित्रपटाचं सुरू होतं शूटिंग

प्रख्यात दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हम साथ साथ हैं(Hum Sath Sath Hain) हा देशातील अतिशय लोकप्रिय आहे. हा मल्टीस्टारर चित्रपट तेव्हा खूपच प्रसिद्ध झाला आणि घराघरांत आव्रजून पाहिला गेला. टीव्हीवरही अनेकांनी हा पिक्चर नक्कीच पाहिला असेल, त्याची सगळीच गाणी खूप लोकप्रिय झाली. 1999 साली 5 नोव्हेंबरला रिलीज झालेला हा चित्रपट 19 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला, पण त्याची कमाई होती तब्बल 82 कोटी रुपये. त्यामपुळे हा चित्रपट त्या दशकातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच अभिनेता सलमान खान आणि इतर काही कलाकार राजस्थानच्या जंगलात काळवीटाची शिकार करण्यासाठी गेले होते. स्थानिक लोकांच्या विरोधानंतर या प्रकरणाला वेग आला. तेव्हापासून या प्रकरणावर वेगवेगळ्या थिअरीज समोर आल्या. अनेकवेळा खुद्द सलमाननेही या प्रकरणावर आपले मौन तोडून वक्तव्य केलं होतं.

त्या दिवशी काय झालं? खुद्द सलमाननेच सांगितलं

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला काही प्रश्न आहेत नेहमीच विचारले जातात. त्यातील एक मुद्दा म्हणजे काळवीट शिकारीचा. सलमानने खरोखरच काळवीटाची शिकार केली होती का? हे अनेकांना जाणून घ्यायचं असंच. याचा खुलासा खुद्द सलमान खानने एका जुन्या मुलाखतीत केला होता. त्या रात्री काय घडल, तो संपूर्ण प्रकार त्यानेच सांगितला होता.

सलमानच्या सांगण्यानुसार – 9 तारेखला ते हम साथ साथ हैं चित्रपटाचं राजस्थानच्या जोधपूरमध्ये शूटिंग करत होते. पण तेवढ्यात पोलिस आले आणि आम्हा सर्वांना घेऊन गेले. तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांचाही त्यात समावेश होता, आम्हा सर्वांनाच जेलमध्ये टाकण्यात आलं पण ते का हे आजही समजू शकलेलं नाही. पहिल्या रिपोर्टमध्येही काळवीट मारल्याचा उल्लेख नव्हता. त्या रिपोर्टमध्ये जिप्सीवरील रक्ताच्या डागांचे स्पष्ट डिटेल्स होते. पण आम्ही कुठेही गेलो नव्हतो हेच खरं आहे, आम्ही फक्त शूटिंग सेटवर होतो. ही केसच नाहीये, असा दावा सलमानने केला होता.

FIR आणि चार्जशीट मध्ये काय म्हटलं?

पण FIR नुसार सत्य काहीच वेगळं आहे. रिपोर्ट्सनुसार, राजस्थानच्या भावातमध्ये रात्री उशीरा काही लोक शिकारीला गेले. बंदूक घेऊन ते निघाले आणि त्यांनी काळवीटाची शिकार केली.पण काळवीटाची शिकार करण्यावर बंदी आहे आणि बिश्नोई समाजात तर काळवीटाची पूजा केली जाते. FIR नुसार त्या दिवशी काळवीटाची शिकार करण्यात आली होती. त्ायनंतर 2 दिवसांनी पुन्हा एका काळवीटाची शिकार झाली. त्यावेळीही काही लोकं जिप्सीमध्ये बसून शिकारीला गेले होते. काही दिवसांनंतर राजस्थानमधील एका गावात पुन्हा गोळीबाराचा आवाज आला, मात्र या दिवशी बंदुकीच्या गोळीचा आवाज आल्याने आसपासचे लोक सावध झाले आणि ज्या दिशेने आवाज आला होता त्या दिशेने त्यांनी त्या लोकांचा पाठलाग केला. त्या दिवशी आपण सलमान खानसह काही लोकांना जिप्सीमध्ये पाहिले होते, असे एका व्यक्तीने त्याच्या जबाबात नमूद केले होते. इतर लोकांपैकू तो फक्त सलमानलाच ओळखू शकला कारण त्याेन आधी त्याचे काही चित्रपच पाहिले होते.

यानंतर याप्रकरणात सलमानचं नाव पहिल्यांदा समोर आलं. आणि या प्रकरणी पहिल्यांदाच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सलमान खानला अटक केली. या प्रकरणात तो दोषी ठरला आणि त्याला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
त्यानंतर या प्रकरणी सलमान खानची अनेकवेळा चौकशी करण्यात आली असून त्यासाठी तो अनेकवेळा जोधपूरलाही गेला. गेल्या 20 वर्षांत तो वेगवेगळ्या प्रसंगी 4 वेळा तुरुंगात गेला आहे. 2018 मध्ये या प्रकरणात तो शेवटचा 2 दिवस तुरुंगात गेला होता.

 काळवीट केस अपडेट

सलमान खानला याप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती, त्यानंतर सलमानने याविरोधात उच्च न्यायालयात अपील केले, तेव्हा ही शिक्षा स्थगित करण्यात आली. मात्र त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले. सध्या या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कोणताही निर्णय दिलेला नाही. हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने आणि कोरोनामुळे या केसला उशीर झाल्याचे कारण पुढे करण्यात आले. सलमान खानला याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई क़डून अजूनही धमक्या मिळतच आहेत. मात्र हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट असून अभिनेता अजूनही पुढील सुनावणीची वाट बघत आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बंडखोरांवर कारवाई, महेश गायकवाडांची हकालपट्टी, सदा सरवणकरांवर कारवाई होणार? बंडखोरांवर कारवाई, महेश गायकवाडांची हकालपट्टी, सदा सरवणकरांवर कारवाई होणार?
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पण युती आणि आघाड्यांच्या जागावाटपात तिकीट न मिळाल्याने काही नेते नाराज आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवारी...
निवडणुकीच्या धामधूमीत आता ‘वर्गमंत्री’ निवडणुकीचा कल्ला; पहा ट्रेलर
लोकगायिका शारदा सिन्हा यांचं निधन, 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
निम्रतसोबत अफेअरच्या चर्चांवर अभिषेक का गप्प? बच्चन कुटुंबीय नाराज, करणार कायदेशीर कारवाई
कर्जतमध्ये लाडक्या बहिणींच्या हाती शिवबंधन, नांदगाव, खांडस, फातिमानगरमध्ये इनकमिंग
प्रा. वामन केंद्रे यांची ‘अभिनयाची जादू’ कार्यशाळा
पोलीस डायरी – नामुष्की!