Malaika Arora: कमी शिक्षण असूनही कोट्यवधींची माया कमवते मलायका, इतक्या संपत्तीची मालकीण
अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. सोशल मीडियावर देखील मलायकाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. मलायकाने कोणत्या सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली नाही. पण सिनेमांमध्ये आयटम सॉन्ग करत मलायकाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. वयाच्या पन्नाशीत देखील मलायका चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आज मलायकाबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
मलायका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीचा हिचा जन्म मुंबई येथील ठाणे याठिकाणी झाला. तिने स्वामी विवेकानंद स्कूल आणि हॉली क्रॉस शाळेतून शिक्षण पूर्ण केलं. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मलायका हिने जय हिंद कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. पण मलायका हिला महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आहे. पण मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर मलायका हिने शिक्षण सोडलं. आज मलायका झगमगत्या विश्वातून कोट्यवधी रुपये कमावणारी अभिनेत्री आहे.
मलायका अरोराची संपत्ती
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायका हिची नेटवर्थ जवळपास 100 कोटी रुपये आहे. सिनेमात आयटम सॉन्ग करण्यासाठी मलायका 1.5 कोटी मानधन घेते. तर रिऍलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका निभावण्यासाठी मलायक एका एपिसोडचे 6 – 8 कोटी रुपये मानधन घेते. मलायका अधिक कमाई योगा स्टुडिओमधून करते. या व्यतिरिक्त, तिला अनेक ब्रँड्सचं प्रमोशन करून अभिनेत्री कोट्यवधी रुपये कमवते. ज्यामुळे गेल्या काही वर्षांत तिच्या नेट वर्थ लक्षणीय वाढ झाली आहे.
पोटगीमध्ये मलायकाला मिळाली इतकी रक्कम
मलायका अरोरा हिचं पहिलं लग्न अभिनेता अरबाज खान याच्यासोबत झालं होतं. 1998 मध्ये दोघांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. पण लग्नाच्या 19 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये मलायका – अरबाज यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मलायकाला अरबाजकडून 15 कोटींची पोटगी मिळाली.
घटस्फोटानंतर मलायका हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. आता मलायका एकटीचा आयुष्य जगत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List