गरीबांच्या तोंडचा ‘भात’ काळ्या बाजारातून दलालांच्या घशात; मिंधे सरकारच्या काळात ब्लॅक मार्केटिंग जोरात

गरीबांच्या तोंडचा ‘भात’ काळ्या बाजारातून दलालांच्या घशात; मिंधे सरकारच्या काळात ब्लॅक मार्केटिंग जोरात

आनंदाचा शिधा या नावाखाली मिंधे सरकार स्वतःची जाहिरातबाजी करीत सुटले आहे. पण प्रत्यक्षात मात्र या रेशनिंगचे ब्लॅक मार्केटिंग सध्या जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. गरीबांच्या तोंडचा भात काळ्या बाजारातून थेट दलालांच्या घशात जात असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. रेशनिंगचा 12 टन तांदूळ एका इंडस्ट्रीजच्या गोदामात उतरवण्याचे काम सुरू असताना हा संपूर्ण साठा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

भिवंडीतील अंजूरफाटा येथील राष्ट्रीय खाद्य निगमच्या गोदामातून रेशनिंगचा 12 टन तांदूळ कल्याणच्या शिधावाटप दुकानांमध्ये नेण्यासाठी जात होता. हा ट्रक रांजणोली नाका येथे आला असताना चालक रमेश जगताप याने जीपीएस यंत्रणा बदलली आणि ट्रक मुंबई-नाशिक महामार्गावरून वाशेरे गावात नेला. याबाबतची माहिती खडकपाडा पोलिसांना मिळताच पोलिसांनी ट्रकचा फिल्मीस्टाईल पाठलाग केला. सदर ट्रक भादाणे येथील जयआनंद फूड इंडस्ट्रीजच्या गोदामात आणला. त्यातील तांदळाच्या 240 गोण्या उतरवत असताना पोलिसांनी भामट्यांवर झडप मारली आणि या काळ्याबाजाराचा पर्दाफाश केला.

ट्रक चालकाने जीपीएस यंत्रणाच बदलली
राष्ट्रीय खाद्य निगमच्या गोदामातून निघालेला तांदळाचा ट्रक कल्याणच्या रेशन दुकानांमध्ये नेणे अपेक्षित होते. पण चालक जगताप याने पोलिसांना गुंगारा देत जीपीएस यंत्रणाच बदलली. तरीही पोलिसांनी पाठलाग करून ट्रक पकडला.

सील ठोकले
आनंद फूड इंडस्ट्रीज या कंपनीच्या गोदामामध्ये रेशनिंगचा तांदूळ कोणाच्या सांगण्यावरून आणण्यात आला, असा सवाल विचारण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी या कंपनीच्या गोदामाला सील ठोकले असून वरिष्ठ पातळीवर चौकशी केली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्र तुटू देणार नाही, महाराष्ट्र लुटू देणार नाही! अंबामातेचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांनी फुंकले रणशिंग महाराष्ट्र तुटू देणार नाही, महाराष्ट्र लुटू देणार नाही! अंबामातेचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांनी फुंकले रणशिंग
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबामातेचे दर्शन घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महाविकास आघाडीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. राधानगरी...
आज मुंबईत महाविकास आघाडीची दणदणीत सभा! राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या तोफा धडाडणार
‘सामना’चे जीमेल, यूटय़ुब चॅनेल हॅक, गैरवापर रोखण्यासाठी सायबर सेलकडे तक्रार
कुठेतरी थांबले पाहिजे! शरद पवारांचे संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत
ठसा – श्याम मोकाशी
सामना अग्रलेख – हिंदू खतरे में! योगींना कॅनडात पाठवा
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार? अटीतटीच्या लढाईसाठी मतदान सुरू; विजयाची समान संधी असल्याचा अंदाज