गडचिरोलीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा
गडचिरोली जिह्यातील छत्तीसगड सीमेवर आज झालेल्या पोलीस-नक्षलवादी चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सी 60 जवानांच्या पथकाला यश आले. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिह्यामध्ये विध्वंसक कारवाया करून घातपात घडविण्याच्या उद्देशाने गेल्या दोन दिवसांपासून काही माओवादी एकत्र येऊन कट रचण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली.
गडचिरोली व नारायणपूर छत्तीसगड सीमेलगत असलेल्या कोपर्शी तालुका भामरागड जंगल परिसरात नक्षलवादी दबा धरून बसले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अभियान यतिश देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन एम. रमेश यांच्या नेतृत्वात सी 60 पथकाच्या 22 तुकड्या व सीआरपीएफच्या क्यूएटीच्या दोन तुकड्या या कोपर्शी जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी माओवादविरोधी अभियान राबविण्याकरिता रवाना करण्यात आल्या.
अशी झाली चकमक
पोलिसांच्या तुकड्या जंगल परिसरात पोहोचताच नक्षलवाद्यांनी पोलीस पथकाच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस पथकाकडून माओवाद्यांना शस्त्र खाली टाकून शरण येण्याचे आवाहन करण्यात आले, परंतु नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार सुरू ठेवला. या गोळीबाराला पोलीस पथकाने जोरदार प्रत्युत्तर दिले. यात पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List