बलात्काराच्या प्रयत्नात होता तरुण, माकडांनी वाचवले सहा वर्षांच्या मुलीचे प्राण; वाचा सविस्तर…

बलात्काराच्या प्रयत्नात होता तरुण, माकडांनी वाचवले सहा वर्षांच्या मुलीचे प्राण; वाचा सविस्तर…

देशात बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना रोज घडतच आहेत. असाच प्रसंग एका सहा वर्षांच्या मुलीवर आला होता. मात्र माकडांचा कळप अचानक घटनास्थळी आल्यामुळे आरोपीने मुलीला तिथेच सोडले आणि पळ काढला.

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील एका गावामध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने अल्पवयीन मुलीला फुस लावली आणि सोबत एका टॉवरवर घेऊन गेला. त्यानंतर त्याने मुलीचे कपडे फाडले आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तितक्यात माकडांचं एक कळप भांडण करत टॉवरमध्ये दाखलं झालं. माकडांना पाहताच आरोपी घाबरला आणि त्याने मुलीला तिथेच सोडत घटनास्थळावरुन पळ काढला. याबद्दल कुठेही वाच्यता केल्याच जीवे मारून टाकीन अशी धमकी जाताजाता आरोपीने पीडित मुलीला दिली.

पीडित मुलीने सदर घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुबीयांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सदर परिसरातील सीसीटीव्ही तपासून पाहिले असता, एक तरुण पीडित मुलीला सोबत घेऊन जात असल्याचं दिसतं आहे. त्या आधारावर पोलिसांनी तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली आह.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मतदाराला राजासारखी वागणूक, सावलीत रांग, व्हीलचेअर आणि दिमतीला स्वयंसेवक मतदाराला राजासारखी वागणूक, सावलीत रांग, व्हीलचेअर आणि दिमतीला स्वयंसेवक
>> देवेंद्र भगत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका निभावली जात असून मतदान केंद्रांवर सावलीत रांगा, वेटिंग रूम,...
20 तारखेला चुकलात तर हे आपला महाराष्ट्र गुजरातला विकून टाकतील! उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला
नरेश गोयल यांना दिलासा; हायकोर्टाने अंतरिम जामीन केला कायम
भाजपने दोन हजार कोटी रुपये खर्च करून महाविकास आघाडी सरकार पाडले; सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप
तुमचा सत्तेचा उन्माद उतरवण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढतोय – शरद पवार
संजीव खन्ना देशाचे 51वे सरन्यायाधीश; सहा महिन्यांचा कार्यकाळ… अनेक महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी करणार
मुद्दा – अल्पसंख्याकांविषयी असूया म्हणजे हिंदुइझम नव्हे!