दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाची कर्नाटकात पुनरावृत्ती, आधी हत्या केली; मग मृतदेहाचे 30 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाची कर्नाटकात पुनरावृत्ती, आधी हत्या केली; मग मृतदेहाचे 30 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती कर्नाटकात झाली आहे. एका 29 वर्षीय महिलेची हत्या करून मृतदेहाचे 30 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले. बंगळुरुतील मल्लेश्वरम परिसरात ही घटना घडली. महालक्ष्मी असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी व्यालीकवल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही हत्या कुणी आणि कोणत्या कारणातून केली याबाबत पोलीस तपास करत आहेत.

महालक्ष्मी ही दुसऱ्या राज्यातील असून कामानिमित्त ती बंगळुरूत एकटीच राहत होती. येथील एका मॉलमध्ये काम करून ती आपला उदरनिर्वाह करत होती. महालक्ष्मी विवाहित असून पतीपासून वेगळी राहत होती. तिचा पती शहरापासून दूर एका आश्रमात काम करत होता. पत्नीच्या हत्येची माहिती मिळताच तो घटनास्थळी दाखल झाला.

घटना उघड होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी इमारतीकडे जाणारे रस्ते बंद केले. श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पोहचत तपास सुरू केला. आठवडाभरापूर्वी महालक्ष्मीची हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

हत्याकांड उघड होताच मल्लेश्वरम परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वरळी-वांद्रे सागरी सेतूवर कार थांबवून चालकाने समुद्रात उडी टाकली वरळी-वांद्रे सागरी सेतूवर कार थांबवून चालकाने समुद्रात उडी टाकली
गुरुवारी मध्यरात्री एक वाजता कारने आलेल्या व्यक्तीने वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून समुद्रात उडी टाकल्याची घटना घडली. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास...
मुंबईतील महत्वाच्या घडामोडी
शिताफीने मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना पकडले, आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश
कर्नाटकातील तरुणाची मुंबईत येऊन जबरी चोरी, पोलिसांनी तीन तासांत पकडले
नागपूरमधील अत्याचारी नराधमाच्या मुसक्या आवळल्या, शिवसेनेच्या दणक्यानंतर पोलीस यंत्रणा हादरली
मंत्रालयावर धडक देण्यासाठी मराठा आंदोलक पोहचले मुंबईत, आझाद मैदानाबाहेर दिला ठिय्या
रखडलेले 17 एसआरए प्रकल्प म्हाडा पूर्ण करणार, हजारो कुटुंबियांना मिळणार दिलासा