शिताफीने मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना पकडले, आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश

शिताफीने मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना पकडले, आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश

कधी पादचाऱ्यांच्या हातातले मोबाईल हिसकावून तर कधी फोन करण्याच्या बहाण्याने मोबाईल घेऊन पसार होणाऱ्या दोघा चोरांना अ‍ॅण्टाप हिल पोलिसांनी पकडले आहे. त्यातील एक अल्पवयीन मुलगा असून त्यांच्याकडून पाच मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

अ‍ॅण्टॉप हिलच्या कोकरी आगार येथील एका घरात घुसून मोबाईलची चोरी झाल्याने त्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवाजी मदने व त्यांचे पथक गुह्याचा शोध घेत होते. दरम्यान सिजीएस कॉलनी येथील गरीब नवाज नगरात राहणारा एक तरुण सतत वेगवेगळे मोबाईल वापरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने बंगाली पुरा येथून विकास इंगळे (19) याला उचलले. त्याने चौकशीत गुह्याची कबूली दिली.

तसेच वांद्रे व अंधेरी येथेही मोबाईल चोरल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्यांनी केलेले मोबाईल चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले. दुचाकीवरून पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकावणे, तर कधी फोन करण्याच्या बहाण्याने मोबाईल मागून पळून जाणे अशी त्यांची गुह्यांची पद्धत असल्याचे सांगण्यात येते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राजाने विरोधी विचार सहन केले पाहिजेत! गडकरींनी कान टोचले राजाने विरोधी विचार सहन केले पाहिजेत! गडकरींनी कान टोचले
लोकशाहीची सर्वात मोठी परीक्षा जर कोणती असेल तर राजाच्या विरुद्ध कितीही प्रखरपणे जर कुणी विचार मांडले तरीही राजाने ते सहन...
साहित्य जगत- मराठी नाटय़सृष्टीतील रागरंग
कथा एका चवीची- आनंदाचा सदिच्छा दूत
जागर- लांडगा आला रे आला…
सत्याचा शोध- आक्रोशाची कविता!
प्लेलिस्ट- आत्मीय सुरांचे सोबती
रंगभूमी- सादरीकरणातील सौंदर्य