भाजप जिंकले तर ईद आणि मोहरमला दोन सिलेंडर फ्री, अमित शहा यांची घोषणा

भाजप जिंकले तर ईद आणि मोहरमला दोन सिलेंडर फ्री, अमित शहा यांची घोषणा

भाजप जिंकले तर ईद आणि मोहरमला दोन सिलेंडर फ्री देण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये मेंढर येथे शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी ही घोषणा केली.

जम्मू-काश्मीरमध्ये अब्दुल्ला, मुफ्ती आणि नेहरू-गांधी परिवाराने 90 च्या दशकापासून आतापर्यंत दहशतवाद पसरवला आहे. मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद संपवला आहे. येथील तरुणांना दगडांऐवजी लॅपटॉप दिला आहे. या निवडणुकांमुळे अब्दुल्ला कुटुंब, मुफ्ती कुटुंब आणि नेहरू-गांधी घराणे यांची राजवट संपुष्टात येणार आहे, असेही अमित शहा आपल्या भाषणात म्हणाले.

2014 मध्ये मोदीजींचे सरकार आले नसते तर पंचायत, ब्लॉक आणि जिल्ह्याच्या निवडणुका झाल्या नसत्या. मोदी सरकारमध्ये ओबीसी, मागासवर्गीय, गुर्जर बकरवाल, डोंगरे यांना आरक्षण मिळाले. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स म्हणतात की आम्ही आरक्षण संपवू, पण भाजप म्हणत आहे की आम्ही गुर्जर बकरवाल आणि पहाडींनाही बढतीत आरक्षण देऊ, असे आश्वासनही अमित शहा यांनी सभेत बोलताना दिले.

महिलांच्या खात्यात 18 हजार रुपये येणार आहेत. तर ईदला 2 सिलिंडर दिले जाणार आहेत. याशिवाय आम्ही 500 युनिट्स मोफत देऊ, असेही अमित शहा यांनी पुढे नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे
व्हिजन वरळी या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी बदलापूरच्या घटनेवरुन चिंता व्यक्त केली. राज ठाकरे म्हणाले की, मूळ विषयाकडून तुम्हाला...
तीच टाळी गालावर वाजवून घ्या, वाढत्या लोंढ्यांबाबत असे का म्हणाले राज ठाकरे
‘तुमच्यात जेवढी… बिल्डरसारख्या औलादींना तेच हवं असतं’; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
कोट्यावधी संपत्ती असलेल्या बिझनेसमॅनसोबत अभिनेत्रीचे लग्न, अभिनयाला करणार कायमचा रामराम?, मोठा खुलासा…
दोन लाख रुपये देऊन झाला IPS, ड्युटी जॉईन करण्यापूर्वीच पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नालासोपारा स्थानकावर टीसीवर हॉकी स्टिकने हल्ला, आरोपी फरार
सी-लिंकवरून उडी घेत कॅब चालकाने संपवले जीवन, ऑनलाईन गेममुळे टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय