IND vs BAN – ऋषभ पंत ‘टेस्ट’मध्ये पास, 633 दिवसांनंतर कमबॅक करत शतक ठोकलं, धोनीशी बरोबरी

IND vs BAN – ऋषभ पंत ‘टेस्ट’मध्ये पास, 633 दिवसांनंतर कमबॅक करत शतक ठोकलं, धोनीशी बरोबरी

हिंदुस्थान आणि बांग्लादेश संघात चेन्नईमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने खणखणीत शतक ठोकले आहे. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या रस्ते अपघातानंतर तब्बल 633 दिवसानंतर पंतने कसोटी संघात कमबॅक केले आणि वेगवान शतक झळकावले. पंतने 124 चेंडूंचा सामना करत सहाव्या कसोटी शतकाला गवसणी घातली. 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने त्याने ही खेळी सजवली. यासह त्याने माजी कर्णधार एम.एस. धोनीच्या शतकांचीही बरोबरी केली.

हिंदुस्थानचा दुसरा डाव 3 बाद 67 असा संकटात असताना ऋषभ पंत मैदानात उतरला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पंतने सलामीवीर शुभमन गिलसोबत मैदानावर शड्डू ठोकला. दोघांनीही बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेत धावफलक हलता ठेवला. संधी मिळताच चौकार-षटकारांचीही आतिषबाजी सुरू होती. यादरम्यान पंतने शतक झळकावले. त्यानंतर तो बाद झाला.

धोनीशी बरोबरी

दरम्यान, हिंदुस्थानकडून सर्वाधिक कसोटी शतक ठोकणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत पंतने धोनीशी बरोबरी साधली. पंतने 58 डावात 6 शतक, धोनीने एवढेच शतक ठोकण्यासाठी 144 डाव घेतले. तिसऱ्या स्थानावर ऋद्धिमान सहा असून त्याने 54 डावात 3 शतक ठोकले आहेत.

बांगलादेशपुढे 515 धावांचे आव्हान

पंत बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि केएल राहुल यांच्यात अर्धशतकीय भागिदारी झाली. गिलनेही शतक साकारत हिंदुस्थानची आघाडी 500 पार पोहोचवली. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने हिंदुस्थानचा डाव 287 धावांनी घोषित करत बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचे आव्हान दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“मी तुम्हाला हात जोडून विनंती करते…”, धारावीच्या आंदोलनादरम्यान वर्षा गायकवाड असं का म्हणाल्या? “मी तुम्हाला हात जोडून विनंती करते…”, धारावीच्या आंदोलनादरम्यान वर्षा गायकवाड असं का म्हणाल्या?
Varsha Gaikwad Appeal To Dharavi People : मुंबईतील धारावी परिसरात शनिवारी सकाळी गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली. धारावी परिसरात असलेल्या एका...
मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीचं विधानसभेशी कनेक्शन?; आदित्य ठाकरे यांचा आरोप काय?
मुख्यमंत्रीपदाबाबत प्रत्येकाची इच्छा, पण लोकं स्वीकारतील असा चेहरा मान्य होईल – राऊत
‘वंचित’ तिसऱ्या आघाडीत सामील होणार?; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं
Dharavi Mosque : धारावी मशीद प्रकरण, मशिदीचे विश्वस्त आणि आंदोलकांची परस्पर भिन्न भूमिका, पुढे काय?
Dharavi Mosque : ‘आत यश देणं अल्लाहच्या हाती’, पोलीस स्टेशन बाहेर आल्यानंतर तो नेता काय म्हणाला?
आज कोणतीही कारवाई होणार नाही, आता घरी जा, धारावीतील आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु