ओएनजीसीतील तेलगळतीने उरणचा भोपाळ होण्याची भीती

ओएनजीसीतील तेलगळतीने उरणचा भोपाळ होण्याची भीती

आशिया खंडातील पहिलाच एलपीजी प्रकल्प अशी ओळख असलेल्या उरणच्या ओएनजीसीला सध्या अनेक संकटांनी घेरले आहे. तेलगळती आणि वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे परिसरातील गावातील हजारो नागरिकांची सुरक्षा व आरोग्य धोक्यात आले आहे. मच्छीमार, शेतकऱ्यांनाही आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मात्र अशा दुर्घटनेनंतरही व्यवस्थापन ढिम्म असल्याने उरणचा भोपाळ होण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

उरण येथील ओएनजीसीचा हा प्रकल्प 1978  साली उभारण्यात आला आहे. वर्षाकाठी सुमारे तीन हजार कोटींचा नफा मिळवून देणारा आशिया खंडातील हा पहिलाच एलपीजी प्रकल्प आहे. एकाचवेळी 10 लाख घरगुती गॅस सिलिंडर भरण्याची व एलपीजी वायूची साठवणुकीची या प्रकल्पाची क्षमता आहे. मात्र प्रकल्प उभारण्यात आल्यापासूनच त्यामध्ये आवश्यकतेनुसार फारशा दुरुस्त्याच झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रकल्पात वारंवार तेलगळती, आगीच्या घटना वाढत आहेत. कधी ईपीटीपी तर कधी को-जनरेशन आदी प्रकल्पांतील विविध भागांत तेलगळती, आगी लागण्याचे प्रकार घडले असून प्रत्येकवेळी प्रशासन, अधिकारी काहीच घडले नसल्याच्या आविर्भावात वागत असल्याने अशा दुर्घटना वारंवार घडू लागल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

तहसीलदारांचा गंभीर आरोप

प्रकल्पात तेलगळती, आगीची घटना घडली तर अनेकवेळा माहिती देण्यास अधिकारी टाळाटाळ करतात. किरकोळ बाब असल्याचे सांगत ओएनजीसी अधिकारी वेळ मारून नेत असतात, असा गंभीर आरोप उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी माहिती देताना केला आहे. अशीच प्रतिक्रिया उरण पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती देताना व्यक्त केली आहे.

आतापर्यंत सहाजणांचा बळी

मागील काही वर्षांपासून वारंवार घडलेल्या विविध प्रकारच्या घटनांमध्ये अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांसह सहाजणांचा बळी गेला आहे. मात्र त्यानंतरही उपाययोजनेच्या नावाने बोंबाबोंब आहे. आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचे तेल समुद्रात वाहून गेले. पण त्याची जबाबदारी आजवर निश्चितच होऊ शकलेली नाही. नियंत्रण कक्षात काम करणाऱ्या अनेकांना प्रकल्प चालवण्याचा अनुभव नसल्याने वारंवार तेलगळती, आगीच्या घटना घडतात, असे कामगारांचे म्हणणे आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार राहील, असा सवाल उरणकरांनी विचारला आहे.

■ 2014- प्रकल्पातून नाफ्ता नाल्यावाटे रस्त्यावरील गटारात वाहत
■ आलेल्या आगीत रामा घरत गावकऱ्याचा होरपळून मृत्यू.
■ 3 सप्टेंबर 2019 ओएनजीसी प्रकल्पात भीषण आग. एका अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू.
■ 25 सप्टेंबर 2019 एपीयू युनिटमध्ये तेलगळती.
■24 ऑगस्ट 2020 क्रूड ऑइलची पाइपलाइन फुटली.
■ 8 सप्टेंबर 2023- स्टोरेज टैंक क्रूड ऑइल गळती
■ 16 सप्टेंबर 2024- प्रकल्पातील क्रूड ऑइल पाइपलाइनला गळती
■ ईपीटीपी, को-जनरेशन प्लाण्टमध्ये अनेकदा तेलगळतीच्या घटना

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘मोहब्बतें’ फेम प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्याचा अपघात, नवरा थेट ICU मध्ये, प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर ‘मोहब्बतें’ फेम प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्याचा अपघात, नवरा थेट ICU मध्ये, प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर
‘मोहब्बतें’ फेम अभिनेत्री फेम प्रिती झंगियानीच्या नवऱ्याचा अपघात झाला आहे. शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली. रिपोर्टनुसार प्रिती...
वर्षा उसगांवकर यांच्यासोबत मोठा घात, अभिनेत्रीने अनेक प्रयत्न करूनही…
निधी वाटपात भाजपचे हर्षवर्धन, भेगडे, बुचके यांच्यावर फुली! संभाव्य बंडखोरीमुळे अजित पवार गट सावध
चंद्रपुरात 7 वर्षाच्या भावेशला बिबट्यानं उचलून नेलं; वन विभागाला जंगलात मुंडकं सापडलं
Nagar accident news – जखमींना रुग्णालयात नेताना रुग्णवाहिकेचा अपघात; तीन ठार, दोघे जखमी
जगभरातून महत्वाच्या बातम्या
IND vs BAN – ऋषभ पंत ‘टेस्ट’मध्ये पास, 633 दिवसांनंतर कमबॅक करत शतक ठोकलं, धोनीशी बरोबरी