Jalna News – आरोग्यासाठी घातक अल्पाझोलम औषधांचा सव्वा आठ लाखांचा साठा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Jalna News – आरोग्यासाठी घातक अल्पाझोलम औषधांचा सव्वा आठ लाखांचा साठा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मानवी आरोग्यास घातक अल्पाझोलम प्रतिबंधीत गुंगीकारक औषधे व टॅबलेट (बटन गोळ्या) विक्रीसाठी बाळगणार्‍या 4 आरोपींच्या ताब्यातुन 8 लाख 18 हजार 400 रुपये किंमतीच्या गोळ्यांचा अवैध साठा जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे. या गोळ्यांचा तरुणांमध्ये अधिक प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून येत आहे.

जालना जिल्ह्यात मानवी आरोग्य घातक असलेले व एनडीपीसी घटक प्रतिबंधीत असलेले गुंगीकारक औषधी व टॅबलेट (गोळ्या) विक्री करणाऱ्या इसमांची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, प्रभारी पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व पथकास सुचना दिल्या होत्या. 6 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना आरोपी अल्तमश ऊर्फ अलमश शेख निसार शेख हा भोकरदन नाका परिसरात अल्पाझोलम हा प्रतिबंधीत घटक असलेल्या गोळ्या विक्री करीत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंच व अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी यांच्यासह छापा कारवाई टाकला आणि अल्तमश शेख याच्या ताब्यातुन एर्दैर्दे-05.50 या कंपनीच्या गोळ्यांचे 7 हजार 120 रुपये किंमतीची पाकीटे जप्त करण्यात आले आहे. त्यास गोळ्यांचा पुरवठा करणारे संतोष बालासाहेब जाधव, राहुल भागाजी गायकवाड (विराज मेडीकल) यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांना सदरच्या गोळया उध्दव शिवाजी पटारे रा.सोमनाथ जळगाव ता.जि. जालना ह.मु सनसिटी जालना हा पुरवठा करीत असल्याचे सांगितल्याने सदर इसमाचा शोध घेतला असता त्याला त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.तसेच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

नमुद आरोपीतांचे ताब्यातुन 8 लाख 18 हजार 400 किंमतीच्या नशेच्या गर्भपाताच्या व उत्तेजक गोळ्यांचे पाकीटे अन्न औषध निरीक्षक वर्षा महाजन यांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आला आहे. आरोपी अल्तमश ऊर्फ अलमश शेख निसार शेख ,संतोष बालासाहेब जाधव,राहुल भागाजी गायकवाड, उध्दव शिवाजी पटारे या इसमांविरुध्द पोलीस ठाणे सदर बाजार जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणातील दोषी असलेल्या मेडीकल व्यवसायिक यांच्या मेडीकल दुकानांचे परवाने रद्द करण्यासाठी संबंधित विभागास प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे,पोलीस अमंलदार रुस्तुम जैवाळ, कैलास खार्डे, जगदीश बावणे, फुलचंद हजारे, भाऊराव गायके, विजय डिक्कर, रमेश राठोड, प्रशांत लोखंडे, सागर बावीस्कर, इरशाद पटेल, अक्रूर धांडगे, मपोना/चंद्रकला शडमल्लु, संदीप चिंचोले, किशोर पुंगळे, सचीन राऊत, योगेश सहाणे, सोपान क्षीरसागर, रमेश काळे व चालक गणपत पवार, रमेश पैठणे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे
व्हिजन वरळी या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी बदलापूरच्या घटनेवरुन चिंता व्यक्त केली. राज ठाकरे म्हणाले की, मूळ विषयाकडून तुम्हाला...
तीच टाळी गालावर वाजवून घ्या, वाढत्या लोंढ्यांबाबत असे का म्हणाले राज ठाकरे
‘तुमच्यात जेवढी… बिल्डरसारख्या औलादींना तेच हवं असतं’; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
कोट्यावधी संपत्ती असलेल्या बिझनेसमॅनसोबत अभिनेत्रीचे लग्न, अभिनयाला करणार कायमचा रामराम?, मोठा खुलासा…
दोन लाख रुपये देऊन झाला IPS, ड्युटी जॉईन करण्यापूर्वीच पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नालासोपारा स्थानकावर टीसीवर हॉकी स्टिकने हल्ला, आरोपी फरार
सी-लिंकवरून उडी घेत कॅब चालकाने संपवले जीवन, ऑनलाईन गेममुळे टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय