Nagar News – विद्यार्थ्यांना दिले निकृष्ट दर्जाचे गणवेश; शाळांसाठी खर्च केलेल्या 1700 कोटींचे विवरण द्या, उच्च न्यायालयाचे आदेश

Nagar News – विद्यार्थ्यांना दिले निकृष्ट दर्जाचे गणवेश; शाळांसाठी खर्च केलेल्या 1700 कोटींचे विवरण द्या, उच्च न्यायालयाचे आदेश

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गोर गरीब विद्यार्थ्यांना दिलेल्या निकृष्ट दर्जाच्या गणवेशासंदर्भातील वृत्ताची खंडपीठाने दखल घेत तीव्र नाराजी व्यक्त केली. शुक्रवारी (20 सप्टेंबर) झालेल्या सुनावणीवेळी शिक्षण खात्याने खर्च केलेल्या निधीचे नेमके विवरण कसे आहे, कुठे किती खर्च करण्यात आला. याची माहिती शपथपत्राद्वारे सादर करावी, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी दिले आहेत.

मराठवाड्यातील बीड, धाराशिवसह इतर जिल्हा परिषद शाळांमध्ये जुगार खेळणे, दारूच्या बाटल्यांचे खच आढळल्याचे प्रकार समोर आले होते. या घटनांची न्यायालयाने गंभीर दखल घेत सुमोटो याचिका दाखल करून घेतलेली आहे. पूर्वीच्या सुनावणीवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांवर 2023-2024 या वर्षामध्ये केंद्र व राज्य सरकारचे मिळून सतराशे कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती खंडपीठात देण्यात आली होती. शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयीन मित्र अँड. रश्मी कुलकर्णी यांनी राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांना दिलेल्या निकृष्ट गणवेशाची माहिती दिली. त्याचबरोबर वृत्त पञातून प्रसिद्ध झालेले जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाच्या गणवेशाचे हे वृत्त अँड. रश्मी कुलकर्णी यांनी न्यायालया समोर मांडले. शासनाने धार्मिक स्थळांसाठी 250 कोटी दिले. मात्र, शालेय विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे गणवेश दिल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शणाास आणून दिले. यामुळे न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

मागिल सुनावणीच्या वेळी शासनातर्फे मोफत शिक्षण हक्क कायद्यान्वये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना केंद्र व राज्याकडून अनुक्रमे 60-40 टक्क्यांनुसार 1700 कोटी रुपये दिल्याचे सांगितले होते. मग इतका मोठा निधी कुठे खर्च केला, असा सवाल करत खर्चाचे नेमके विवरण एका आठवड्यात शपथपत्राद्वारे सादर करावे असे आदेश न्यायालयाने दिले. यासाठी शासनाकडून मिळणारा निधी शैक्षणिक सुविधांवरच खर्च होतो का? याच्या पडताळणीकरिता राज्य पातळीवर उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आल्यानंतर जिल्हास्तरावरही याच अनुषंगाने निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठित करण्याचे आदेश खंडपीठाने मागील सुनावणीवेळी दिले होते. त्यानुसार पुणे, सोलापूर, सांगली, अशा पाच जिल्ह्यांमधून जिल्हा स्तरावरील समितीसाठी निवृत्त न्यायाधीशांची नावे समोर आल्याची माहिती खंडपीठात देण्यात आली. पुढील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायालयीन मित्र (अमिकस क्युरी) म्हणून अँड. रश्मी कुलकर्णी काम पाहत आहेत. त्यांना अँड. नमिता ठोळे सहकार्य करीत आहेत. राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी बाजू मांडली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाहेरच्या लोकांना आम्ही का कड्यावर घ्यायचं, राज ठाकरे कडाडले बाहेरच्या लोकांना आम्ही का कड्यावर घ्यायचं, राज ठाकरे कडाडले
वरळी व्हिजन या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी सरकार आणि विरोधक दोघांवर टीका केली आहे. मराठी माणसांच्या हातातून मुंबई जातेय...
स्वाभिमानाने जगायचं असेल तर स्वाभिमानी मणका दुरुस्त करून घ्या- राज ठाकरे कडाडले
रजनीकांत यांनी केला थेट अमिताभ बच्चन यांच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाले, त्यावेळी…
सामाजिक कार्यकर्त्या ते दिल्लीच्या मुख्यमंत्री, असा आहे आतिशी यांचा राजकीय प्रवास
Nagar News – नगर जिल्हा सहकारी बँक कोणत्याही क्षणी संपुष्टात येवू शकते, ॲड. प्रतापराव ढाकणे यांचा आरोप
भाजप जिंकले तर ईद आणि मोहरमला दोन सिलेंडर फ्री, अमित शहा यांची घोषणा
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर कारखान्यांना 10 हजार कोटीचा फटका, शंकरराव गडाख यांचा आरोप