श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची आर्थिक लूट

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची आर्थिक लूट

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शनिवार, रविवार व इतर शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. या संधीचा फायदा घेत खासगी वाहतूकवाले अन् थेट दर्शनसाठी खासगी एजंट यांच्याकडून भाविकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू असून, याकडे संबंधित प्रशासन विभाग दुर्लक्ष करत असल्याने भाविक नाराजी व्यक्त करत आहेत. याकडे आंबेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पुणे जिल्ह्यातील सहावे ज्योतिर्लिंग असून येथे गुजरात, कर्नाटक, राजस्थान आदी राज्यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी येत आहे. संबंधित भाविक दर्शनासाठी श्री क्षेत्र भीमाशंकरला येत असताना, त्यांना घोडेगाव (ता. आंबेगाव) पोलीस ठाण्याचे कर्मचारी भाविकांच्या गाड्या मंदिराच्या अलीकडे दोन किलोमीटर अंतर असलेल्या वाहनतळांवर गाड्या लावत आहे. तेथून पुढे जाण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने वाहनतळाच्या शेजारीच उभे खासगी वाहतूक करणारे भाविकांना मंदिर इधर से बहुत दूर है! असं सांगत ज्या राज्यातील भाविक आहे त्याप्रमाणे शंभर ते पाचशे रुपये प्रति व्यक्ती तिकीट घेत आहेत. तसेच एक दोन व्यक्ती असतील तर मोटारसायकलवर वाहतूक करणारे ट्रिपल सीट भाविकांना नेत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी एखाद्या भाविकाची गाडी बसस्थानकापर्यंत सोडली तर बसस्थानकासमोर पोलिसांची बॅरिकेड लावून उभे असलेले खासगी एजंट मंदिरापर्यंत गाडी सोडण्यासाठी व थेट दर्शनासाठी लहान चारचाकी गाडीचे चार ते पाच हजार रुपये घेत आहेत. व्हीआयपी गेटमधून मंदिराकडे जात असताना संबंधित गाडीची नोंद न घेता संबंधित अधिकारी, कर्मचारी भाविकांची गाडी सोडत आहेत. अशा पद्धतीने भाविकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे.

खासगी वाहतूकवाले व थेट दर्शनासाठी असलेले खासगी एजंट यांची मोठ्या प्रमाणात ओरड झाली की, ते आपला व्यवसाय एक-दोन दिवस बंद ठेवतात. अन् पुन्हा नवीन दरवाढीसह प्रशासनाच्या आशीर्वादाने पुन्हा व्यवसाय सुरू करत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सुनील गावस्कर कृष्ण तर अशोक सराफ बलराम; नाटकाचा भन्नाट किस्सा सुनील गावस्कर कृष्ण तर अशोक सराफ बलराम; नाटकाचा भन्नाट किस्सा
अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म मुंबईचा. 4 जून 1947 रोजी त्यांचा जन्म झाला. सहा-साडेसहा वर्षांचे असतानाच त्यांनी वाडीतल्या एकांकिकेमध्ये पहिल्यांदा...
आई – वडिलांच्या घटस्फोटानंतर अभिनेत्री मर्सिडीजमधून मुंबई लोकलमध्ये, खडतर आयुष्याबद्दल म्हणाली…
‘लग्न यशस्वी झाले नाही, माझी काय चूक?’, समांथाने घटस्फोटाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत, आयटम साँग न करण्याचा दिला होता सल्ला
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींबद्दल इमरान हाश्मीचं वक्तव्य; म्हणाला..
पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानचा मोठा निर्णय; सर्वत्र होतंय कौतुक
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात चोरी; 34 लाखांचे दागिने घेऊन मोलकरीण पसार
ऐकण्याच्या बाबतही महिला वरचढ, संशोधनातून नवी माहिती समोर