रेल्वे पॅसेंजरवर अज्ञाताने केलेल्या दगडफेकीत चिमुकलीचा मृत्यू
विजयपूर-रायचूर पॅसेंजरवर अज्ञाताने केलेल्या दगडफेकीत एका चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. होटगी ते टिकेकरवाडी दरम्यान अज्ञाताने दगडफेक केली. शिवानी ऊर्फ आरोही अजित कांगले असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. सोलापुरातील अजित कांगले हे दरवर्षी कर्नाटकातील लच्याण येथे कुटुबीयांसह यात्रेसाठी जातात. यात्रा करून विजयपूर-रायचूर पॅसेंजरने सोलापूरकडे येत होते. त्याच्याबरोबरील शिवानी ऊर्फ आरोही कांगले (वय 4) ही रेल्वे बोगीतील खिडकीजवळ बसली होती.
होटगी ते टिकेकरवाडी दरम्यान अज्ञाताने दगडफेक केली. यात एक दगड शिवानीच्या डोक्याजवळ लागल्यामुळे कान आणि तोंडातून रक्त येऊन ती जागीच बेशुद्ध पडली. तिला वेळीच उपचारासाठी सुविधा मिळाल्या नाहीत. सोलापूरला येताच कुटुबीयांनी तिला खासगी दवाखान्यात दाखल केले; परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी मुलीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे. रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List