मध्य प्रदेशातील भाजप नेत्याकडून तरुणीचा विनयभंग, पक्षाने केली हकालपट्टी
मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यावर एका तरूणीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर भारतीय दंड संहितेच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते सुरेश सिंह असे त्यांचे नाव आहे. सुरेश यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना पक्ष कार्यालयाजवळ घडली. येथे सुरेश सिंगने एका तरूणीकडे पाणी मागितले. ज्यावेळी ती पाणी घेऊन आली तेव्हा त्याने मुलीसोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पीडिता घाबरली होती. त्यामुळे तिने याबाबत सीधीच्या आमदार रिती पाठक यांच्यासह पक्षाच्या नेत्यांकडे तक्रार केली होती. त्यामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विष्णू दत्त शर्मा यांच्या सूचनेनुसार, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सिंह यांना पक्षातून काढून टाकण्याचे आदेश दिले. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून सखोल चौकशीनंतर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, सुरेश सिंह यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी या प्रकरणावर आपली बाजू मांडली. माझ्यावरचे आरोप खोटे आहेत.लष्करातून निवृत्त झाल्यानंतर मी प्रामाणिकपणे पक्षात काम करत आहे. पक्षाने कारवाई करण्यापूर्वी माझे मत विचारले नाही. मात्र असे असले तरीही मी तपासात पूर्ण सहकार्य करेन, असे ते यावेळी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List