कोणती फळे फ्रीजमध्ये ठेवू नयेत! वाचा सविस्तर
आपल्या निरोगी आरोग्यासाठी फळे ही खूप गरजेची असतात. परंतु ही फळं कशी साठवावी याचेही काही नियम आहेत. फळांच्या ताजेपणाचे रहस्य त्यांच्या योग्य काळजीमध्ये आहे! पपई आणि केळी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याची चूक करू नका, अन्यथा त्यांची चव आणि पोत खराब होऊ शकते. काही फळे थंडीत सुकतात, तर काही त्यांचा गोडवा गमावतात. आजकाल फळे आणि भाज्या ताज्या ठेवण्यासाठी प्रत्येकजण रेफ्रिजरेटर वापरतो. अशी काही फळे आहेत ज्यांची चव आणि पोत रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास खराब होऊ शकते. पपई आणि केळी ही अशी दोन फळे आहेत जी लोक थंड ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात, परंतु ही पद्धत योग्य नाही.
पपई रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने ती लवकर घट्ट होऊ शकते. पपईचा नैसर्गिक गोडवा आणि ओलावा फ्रीजमध्ये ठेवल्यास कमी होऊ शकतो. केळी फ्रिजमध्ये ठेवल्यावर ते काळे पडू लागते आणि त्याची पोत देखील बदलतो. काही फळे खोलीच्या तापमानातच ठेवल्यास ती चांगली राहतात. खोलीच्या तापमानामध्ये फळं नैसर्गिकरीत्या पिकतात, त्यामुळे त्यांचे पोषक घटक टिकून राहतात. फळे योग्यपद्धतीने कशी साठवावी यामध्ये काही गोष्टी या लक्षात ठेवायला हव्यात. त्यामुळे फळे ताजीही राहतील आणि त्यांची मूळ चवही अबाधित राहील.
कोणती फळे फ्रीजमध्ये ठेवू नयेत
पपई हे एक उष्णकटिबंधीय फळ आहे, म्हणूनच पपई फ्रीजमध्ये ठेवू नये. फ्रीजमध्ये ठेवल्यास पपई पिकण्याची प्रक्रिया थांबते. तसेच पपईच्या नैसर्गिक चवीवर परिणाम होतो. पपई कच्ची असेल तर ती खोलीच्या तापमानाला पिकू द्यावी.
केळी हे अशा फळांपैकी एक आहे, जे फ्रीजमध्ये ठेवणे योग्य नाही. केळी फ्रीजमध्ये ठेवल्यास, केळीची साले लवकर काळी पडू लागतात. केळी फ्रीजमध्ये ठेवल्यास केळी नैसर्गिक पिकण्याचे चक्र थांबते. त्यामुळे केळीची चव बिघडते.
आंबा फ्रीजमध्ये ठेवल्याने आंब्याचा गोडवा कमी होऊ शकतो आणि त्याच्या सुगंधावर परिणाम होऊ शकतो.
डाळिंब खोलीच्या तापमानातच ठेवणे केव्हाही उत्तम.
संत्री आणि लिंबू – ही फळे त्यांच्या नैसर्गिक जाड सालीमुळे खोलीच्या तपमानावर बराच काळ ताजी राहतात. संत्री किंवा लिंबू रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले तर ते लवकर कडू होतात.
अननस फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याची चव चांगली लागत नाही.
पेरू- रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने त्याचा सुगंध आणि चव कमी होऊ शकते.
पीच आणि प्लम – फ्रीजमध्ये ठेवल्यास ही फळे सुरकुत्या पडू शकतात आणि आतून कमी रसदार होऊ शकतात.
फ्रीजमध्ये कोणती फळे ठेवणे चांगले?
सफरचंद, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, चेरी, कापलेले टरबूज, लिची, द्राक्षे
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List