ठाकरे बंधूमध्ये कोणत्याही राजकीय व्यक्तीने बोलण्याची गरज नाही; संजय राऊत यांनी ठणकावले
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत जनभावना सकारात्मक आहे. ही जनभावना सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे. आम्ही या जनभावनेचा आदर करत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सध्या राज ठाकरे मुंबईत नाहीत. या दोन नेत्यांच्या भेटीनंतर चर्चा होईल आणि पुढील दिशा ठरेल, तोपर्यंत आपण वाट बघितली पाहिजे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे सध्या मुंबई नाही. ते नेमके कोठे आहेत, याबाबतची आपल्याला माहिती नाही. मात्र, राज ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी हात पुढे केला आहे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. आपण इथेच थांबायला हवे. काही दिवस वाट बघा. मनसेप्रमुख राज ठाकरे मुंबईत नाहीत. त्यांना मुंबईत येऊ द्या, त्यानंतर आपण चर्चा करू. रोज यावर चर्चा करू या विषयांचे गांभीर्य कमी करण्याची गरज नाही. याबाबत जनतेच्याही सकारात्मक भावना आहे. मिडीया तर खूप पुढे गेला आहे. त्यांनी एकत्र येण्याची थेट घोषणाही करून टाकली, असा टोलाही त्यांनी प्रसारमाध्यमांना लगावला.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे भावाचे नाते आहे. या दोघांमध्ये कोणत्याही राजकीय नेत्याने वक्तव्य करण्याची गरज नाही. या दोघांचे नाते काय आणि कसे आहे, ते सर्वांना माहिती आहे. अनेक वर्षे आपण दोघांनाही बघत आहोत, त्यांच्यासोबत आहोत.त्यामुळे त्या दोघांच्या एकमेकांबाबत काय भावना आहेत, त्यांच्या कुटुंबात काय भावना आहेत, याची माहिती आणि जाणीव आपल्याला आहे. राजकारणामुळे अशी नाती तुटत नसतात. उद्धव ठाकरे यांबाबत सकारात्मक आहेत. महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे नुकसान होऊ नये, याबाबत त्यांची ठाम भूमिका आहे. ज्यांना ज्यांना महाराष्ट्रहितासाठी एकत्र यायचे आहे, त्यांनी यावे ,अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या एका प्रमुख नेत्याने आपल्याशी संपर्क साधला. आम्हीलांही या प्रवाहात एकत्र यायचे आहे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्याबाबत आताच आपण माहिती देणार नाही. राज्यातील दोन प्रमुख ठाकरे महाराष्ट्रहितासाठी एकत्र येण्याचा विचार करत असतील तर आम्हाला मागे राहता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सहभाग घेत मराठी माणसांची, महाराष्ट्राची एकजूट करण्यात पुढाकार घेतला होता. त्याचप्रमाणे आता एकत्र येण्यासाठई आंबेडकरी चळबळतले अनेक नेते संपर्क करत आहेत.महाराष्ट्रावर आणि मुंबईत मराठी माणासांचा ठसा कायम असावा, अशी सगळ्यांचीच भावना आहे.
उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि ठाकरे कुटुंब यांच्याशी आपले जिव्हाळ्याचे नाते आहे.बराच मोठा कालखंड आम्ही एकत्र होतो. आम्ही एकत्र काम केले आहे. मात्र, राजकारणामुळे मार्ग वेगळे झाले, तरी भावनांचा ओलावा आणि नाते कायम असते. राजकीय विचारभिन्नतेमुळे वाद होतच असतात. मात्र, जिव्हाळा, भावना कायम असतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. ठाकरे बंधूनी एकत्र यावे, ही जनभावना आहे. ती सर्वांनी समजून घेतली पाहिजे. आम्ही ती समजून घेत सकारात्मक प्रसिसाद दिला आहे.उद्धव ठाकरे यांच्या मनात कोणताही अंहकार किंवा कटुता नाही. राजकीय भांडणांमुळे मैत्री किंवा नाते तुटत नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List