ऐश्वर्या रायसोबत काम केलेल्या या सुपरस्टारचं करिअर उद्ध्वस्त का झालं? टॉयलेट साफ करण्याची वेळ
बॉलिवूडमध्ये यश-अपयश हे सुरुच असतं. काही जण करिअरच्या सुरुवातीलाच सुपरस्टार बनतात तर काहींचा स्ट्रगल हा सुरुच राहतो. पण जेव्हा तुम्हाला यश मिळतं तेव्हा तुमची मेहनत आणि नम्रपणा विसरता कामा नये. पण काहीवेळेला काही कलाकार यशाच्या धुंदीत असे गुंग होऊन जातात की त्यांच्या स्वभावात नकळत काहीसा अहंकार दिसून येऊ लागतो. त्याचा थेट परिणाम त्यांच्या करिअरवर होतो. यश मिळाल्यानंतरही तुम्ही नम्र राहणं गरजेच असतं. कारण अपयश स्टार्सना असे काहीतरी करण्यास प्रवृत्त करू शकतं. ज्याचा त्यांना नंतर पश्चात्ताप होतो. पण प्रत्येकजण असाच असेल असं नाही, कारण प्रसिद्धी मिळाल्यानंतर बरेच जण बदलतात आणि हे चित्रपटसृष्टीत अनेकदा दिसून येते. असच काहीस झालं एका अभिनेत्यासोबत.
एका चुकीने त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं.
इंडस्ट्रीत आल्यानंतर अनेक कलाकार हे सुपरस्टार होण्याचं स्वप्न पाहतात आणि असाच एक अभिनेता होता त्याने खूप मेहनतही घेतली . एवढच नाही तर 90 च्या दशकात ऐश्वर्या राय बच्चनसोबत काम करून लोकप्रिय झाला. पण त्याची लोकप्रियता फार काळ टिकली नाही. त्याच्या एका चुकीने त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं.या अभिनेत्याला त्याचं यश हे सांभाळता आलं नाही. ज्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या करिअरवर झाला. त्याची अभिनय कारकीर्द पूर्णपणे संपुष्टात आली. अक्षरश: त्याला बॉलिवूड सोडून न्यूझीलंडला गेला.

टॉयलेट क्लीनर आणि टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करण्याची वेळ
हा अभिनेता आहे मिर्झा अब्बास अली. एका रिपोर्टनुसार बॉलिवूडपासून दूर झाल्यावर मिर्झा सध्या न्यूझीलंडमध्ये त्याचं वेगळं एक जीवन जगत आहे. दिवाळखोरी झाल्यानंतर, त्याने टॉयलेट क्लीनर आणि टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केल्याचे वृत्त आहे. एकेकाळी या प्रसिद्ध अभिनेत्याने ऐश्वर्या राय बच्चन, तब्बू यांसारख्या स्टार्ससोबत काम केलं आहे.
अहंकारामुळे यश गमावलं
‘कांडुकोंडैं कांडुकोंडैं’ (2000) या रोमँटिक नाटकातून मिर्झा अब्बास अलीला ब्रेक मिळाला. जिथे त्याने ऐश्वर्या राय, मामूटी, अजित कुमार आणि तब्बू यांच्यासोबत काम केले. त्यानंतर त्याच्याकडे तमिळ चित्रपटसृष्टीतील एक रायझिंग स्टार म्हणून पाहिले जात असे. त्याने ‘कधल देसम’ या हिट तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, ज्याला समीक्षक आणि व्यावसायिक दोन्ही स्तरावर प्रशंसा मिळाली. अभिनय करण्यापूर्वी मिर्झाने 1996 मध्ये मॉडेल म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. प्रिया ओ प्रिया, राजहंस, राजा, कन्नेझुठी पोटम थोट्टू, सुयमवरम आणि पदयाप्पा यासारख्या अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये तो दिसला आहे.
मात्र त्याचा हा यशस्वी बॉलिवूड प्रवास फार काळ टीकू शकला नाही. तेही त्याच्या अहंकारामुळे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List