आम्हाला वाटलं हा डिप्रेशनमध्ये आहे; घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलसोबत दिसणारी ‘मिस्ट्री गर्ल’ कोण?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या सामन्यावर खिळल्या आहेत. दुबईतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळला जाणारा हा सामना लाइव्ह पाहण्यासाठीही हजारो चाहते आले आहेत. टीम इंडियातून बाहेर असलेला फिरकीपटू युजवेंद्र चहलही पोहोचला असल्याचे दिसत आहे. तो टीम इंडियाला पाठिंबा देत असताना त्याच्यासोबत दिसणाऱ्या मिस्ट्री गर्लने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिला पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
युजवेंद्र चहलला दुबईमध्ये पाहून सर्वांना आनंद झाला. त्याचे स्टेडियममधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये तो मिस्ट्री गर्लसोबत दिसत आहे. तसेच त्याला आनंदी पाहून नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Hum to soch rahe chahal sahab depression mein hai ye to yaha
#INDvsNZ#ChampionsTrophyFinal pic.twitter.com/e2xKVPBJWd
— Raja Babu (@GaurangBhardwa1) March 9, 2025
एका यूजरने युजवेंद्रचा स्टेडीममधील मिस्ट्री गर्लसोबतचा फोटो शेअर करत, ‘आम्हाला तर वाटले होते की साहेब डिप्रेशनमध्ये गेले आहेत’ असे उपरोधकपणे म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List