Weight Loss- वजन कमी करण्यासाठी आणि डायबेटीजसाठी रामबाण उपाय आहे ही औषधी वनस्पती!!!
दूध आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. इसबगोल ही अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जाणारी औषधी वनस्पती आहे. इसबगोलाला इंग्रजीत Psyllium Husk म्हणतात. इसबगोल दुधात मिसळून प्यायल्याने पचन, रक्तातील साखरेसारख्या समस्या दूर होतात. इसबगोलमध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, जीवनसत्त्वे यांसह अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात.
इसबगोलचे फायदे
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी दूध आणि इसबगोलचे दररोज सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. यामध्ये असलेले जिलेटिन रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरू शकते. म्हणूनच मधुमेहींसाठी इसबगोल हे रामबाण ठरलेले आहे.
सध्याच्या घडीला आपल्याला अपचन आणि करपे ढेकर यांचा त्रास हा मोठ्या प्रमाणात होतो. यावेळी इसबगोल खाणे हे परिणामकारक मानले गेले आहे.
कोलेस्ट्राॅल कमी करण्यासाठी इसबगोल खाणे हे केव्हाही बेस्ट आहे असे म्हटले जाते. इसबगोलचे नियमित सेवन केल्यामुळे कोलेस्ट्राॅल कमी होण्यास मदत होते.
तुम्ही डायरियाच्या समस्येने त्रस्त असाल तर इसबगोलचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जुलाबाच्या रुग्णांसाठी इसबगोल आणि दूध यांचे एकत्र सेवन केल्यास फायदा होतो.
हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी इसबगोल आणि दुधाचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते.
बद्धकोष्ठता ही आजकालच्या सामान्य समस्यांपैकी एक आहे. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही इसबगोल आणि दुधाचे एकत्र सेवन करू शकता.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List