अमेरिकेत आणखी एका हिंदुस्थानी विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, वडिलांची मन सुन्न करणारी प्रतिक्रिया

अमेरिकेत आणखी एका हिंदुस्थानी विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, वडिलांची मन सुन्न करणारी प्रतिक्रिया

अमेरिकेत हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचे हत्यासत्र सुरुच आहे. आता आणखी एका विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील विद्यार्थ्याची अमेरिकेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. जी. प्रवीण (वय – 27) असे विद्यार्थ्याचे नाव आहे.

प्रवीण हा विस्कॉन्सिनमधील मिलवॉकी येथे उच्च शिक्षणासाठी गेला होता. शिक्षणाबरोबरच तो एका दुकानात पार्ट टाइम कामही करत होता. याच दुकानावर अज्ञात हल्लेखोरांनी दरोडा टाकला आणि त्यावेळी केलेल्या गोळीबारामध्ये प्रवीणचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही घटना घडली असून अमेरिकन अधिकाऱ्यांनी याबाबत मुलाच्या वडिलांना माहिती दिली.

याबाबत मुलाच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सकाळी 5 वजाता प्रवीणचा व्हॉट्सअप कॉल आला होता. मात्र कामात असल्याने मी उचलू शकलो नाही. मिस्ड कॉल पाहिल्यानंतर मी त्याला व्हाईस मेसेज पाठवला. पण, तासभरानंतरही त्याचा कॉल आला नाही. त्यानंतर मी त्याच्या दुसऱ्या नंबरवर कॉल केला, मात्र संपर्क झाला नाही. काहीतरी घडले असावे असा संशय आल्याने मी कॉल कट केला.

आम्ही त्याच्या मित्रांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, प्रवीणची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. तो एका दुकानामध्ये पार्ट टाइम काम करायचा. याच दुकानात दरोडा टाकताना हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि यातील एक गोळी प्रवीणला लागली. त्यातच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती देताना प्रवीणच्या वडिलांना हुंदका आवरला नाही. आता आमच्यासाठी सगळेच संपले असून प्रवीणच्या आईला या घटनेचा जबरदस्त धक्का बसल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रवीणने डेटा सायन्समधून पदवीचे शिक्षण घेतले होते. त्यांनतर 2023 मध्ये तो उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला होता. जानेवारी महिन्यात तो हिंदुस्थानमध्ये आला होता. त्याचा कोर्स संपण्यास फक्त 4 महिने बाकी होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने अमेरिकेतच नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याआधीच त्याची हत्या करण्यात आली, अशी मन सुन्न करणारी प्रतिक्रिया प्रवीणचे वडील राघवुलू यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का; एकाचवेळी चार बडे नेते सोडणार उद्धव ठाकरेंची साथ मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का; एकाचवेळी चार बडे नेते सोडणार उद्धव ठाकरेंची साथ
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं...
IPS अधिकाऱ्याची सावत्र मुलगी अन् अभिनेत्री सोन्याच्या तस्करीत, 13 कोटींचे सोने जप्त, बॉलीवूड स्टाईलने तस्करी
राज्यातील 58, 394 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट, अजूनही मिळाले नाही अनुदान
राज्यातील 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कोणाची कुठे झाली नियुक्ती…
Video – मुंबईने सर्वधर्मीयांच्या पोटाची काळजी घेतली – भास्कर जाधव
धक्कादायक! मीच या मठाचा पुजारी आणि मालक म्हणत धर्मोपदेशकाला लोखंडी गजाने मारहाण
Video – मराठी भाषेचा अन्याय आम्ही सहन करणार नाही – अनिल परब