VIDEO: ‘छावा’ पाहून विद्यार्थ्यांनी म्हटली शिव गर्जना, व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा

VIDEO: ‘छावा’ पाहून विद्यार्थ्यांनी म्हटली शिव गर्जना, व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा

सध्या सगळीकडे ‘छावा’ चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी देशभरातील प्रेक्षकांनी थिएटरमध्ये तुफान गर्दी केली आहे. चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक नवे विक्रम केले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाळकरी विद्यार्थी शिव गर्जना म्हणताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर नक्की काटा येईल.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हा तेलंगणामधील एका थिएटरमधील आहे. या थिएटरमध्ये सरस्वती शिशू मंदीर हायस्कूल कामारेड्डी मधील विद्यार्थ्यांना ‘छावा’ सिनेमा दाखवण्यासाठी आणले असल्याचे दिसत आहे. हे शाळकरी विद्यार्थी चित्रपट संपल्यानंतर शिव गर्जना म्हणताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhu patel (@madhu_patel_patriot)

अनेकांनी हा व्हिडीओपाहून त्यावर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने, ‘हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती संभाजी महाराज की जय! अभिमानास्पद क्षण’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, ‘हा व्हिडीओ पाहून मला एक प्रश्न पडला आहे की हे महाराष्ट्रामधील चित्रपटगृहामध्ये का घडत नाही. तेलंगणामधील या विद्यार्थांना माझा आशिर्वाद’ असे म्हणत प्रश्न उपस्थित केला आहे. तिसऱ्या एका यूजरने शाळेच्या मॅनेजमेंटचे कौतुक केले आहे.

‘छावा’ सिनेमाविषयी बोलायचे झाले तर हा सिनेमा १४ फेब्रुवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने ‘जवान’, ‘पठाण’, ‘पुष्पा’ यांसारख्या सिनेमांना कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. स‌ॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘छावा’ सिनेमाच्या पहिल्या दिवसाची कमाई ही ३१ कोटी रुपये होते. आता या कमाईमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. शिवजंयतीच्या मूहुर्तावर चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाने सहा दिवसांमध्ये जवळपास ९७.७५ कोटी रूपयांची कमाई केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महिला दिनानिमित्त एमपॉवरचा धक्कादायक अहवाल, मुंबईकर महिला ‘या’ कारणामुळे तणावग्रस्त महिला दिनानिमित्त एमपॉवरचा धक्कादायक अहवाल, मुंबईकर महिला ‘या’ कारणामुळे तणावग्रस्त
महिलांचे मानसिक आरोग्य गंभीर संकटात आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) आकडेवारीनुसार, भारतात आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण ३६.६ टक्के आहे....
संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहिल्यानंतर लेक पहिल्यांदाच बोलली…, तुम्हालाही अश्रू नाही आवरणार
सरकारी रुग्णवाहिकेसाठी फोन केला, सहा तासांत रुग्णवाहिका आली नाही…रुग्णाने सोडले प्राण
बेघर मुंबईकरांसाठी एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, मिळणार हक्काचं घर!
Video: तुम्ही निघा!; अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांना सर्वांसमोर स्टेजवरून उतरवले खाली
जयकुमार गोरेने मला दंडवत घातला म्हणून चांगुलपणाच्या भावनेतून केस मागे घेतली, पण आता…; पीडित महिलेचा इशारा
TB रुग्णांसाठी Meropenem इंजेक्शन महानगरपालिका, सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत द्यावीत, सुनील प्रभू यांची मागणी