Beauty Tips- तिशीनंतर आहारात कोलेजनयुक्त पदार्थांचा समावेश वाढवा! त्वचा सुंदर राहण्यासाठी कोलेजन आहे खूप गरजेचे

Beauty Tips-  तिशीनंतर आहारात कोलेजनयुक्त पदार्थांचा समावेश वाढवा! त्वचा सुंदर राहण्यासाठी कोलेजन आहे खूप गरजेचे

आपली त्वचा सुंदर आणि चमकदार असायला हवी असे प्रत्येकीला वाटते. परंतु चमकदार आणि तजेलदार त्वचा हवी असल्यास, त्वचेतील कोलेजनचे उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. कोलेजन हे एक प्रथिन आहे जे आपल्या त्वचेत नैसर्गिकरित्या आढळते. कोलेजनमुळे चेहरा तरुण आणि चमकदार बनतो.

शरीरामध्ये कोलेजनची कमतरता आढळल्यास, हाडांचे आणि त्वचेचे विकार सुरु होतात. शेवटी कोलेजन म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. वास्तविक, कोलेजन हे एक प्रोटीन आहे जे आपल्या त्वचेत नैसर्गिकरित्या आढळते. वयोमानापरत्वे कोलेजन हे खूप कमी होत असते. त्यामुळेच कोलेजन वाढविण्यासाठी आपल्याला आहारात बदल करणे हे खूप गरजेचे आहे.

 

 

लिंबूवर्गीय फळं- तुमच्या दैनंदिन आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध असलेल्या लिंबूवर्गीय फळांचा समावेश केला तर कोलेजनचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे संत्री, द्राक्षं, लिंबू असे किमान एक तरी लिंबूवर्गीय फळ खावे. बेरी देखील कोलेजनचा उत्कृष्ट स्त्रोत आहेत.

लसूण- तुम्ही रोज लसणाचे सेवन केले तर ते तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तुमचे कोलेजन वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. वास्तविक त्यात सल्फरचे प्रमाण जास्त असते.

 

हिरव्या पालेभाज्या- हिरव्या भाज्यांमध्ये क्लोरोफिल असते ज्यामुळे त्वचेतील कोलेजन वाढते. रोजच्या आहारात याचा समावेश केल्यास त्वचा तजेलदार होऊन त्वचा निरोगी राहते.

फॅटी फिश- आहारात मासे खाणे हे कोलेजन वाढविण्याचा उत्तम स्त्रोत आहे. माशांमध्ये ओमेगा 3 मुबलक प्रमाणात असल्यामुळे कोलेजन वाढीसाठी हे खूप उपयुक्त मानले जाते.

ओवा- ओव्यामुळेही आपल्या शरीरामध्ये कोलेजन वृद्धी होते. ओव्यामध्ये असणारे सिलिकाॅन कोलेजनवाढीसाठी महत्त्वाचे मानले जातात.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का; एकाचवेळी चार बडे नेते सोडणार उद्धव ठाकरेंची साथ मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का; एकाचवेळी चार बडे नेते सोडणार उद्धव ठाकरेंची साथ
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं...
IPS अधिकाऱ्याची सावत्र मुलगी अन् अभिनेत्री सोन्याच्या तस्करीत, 13 कोटींचे सोने जप्त, बॉलीवूड स्टाईलने तस्करी
राज्यातील 58, 394 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट, अजूनही मिळाले नाही अनुदान
राज्यातील 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कोणाची कुठे झाली नियुक्ती…
Video – मुंबईने सर्वधर्मीयांच्या पोटाची काळजी घेतली – भास्कर जाधव
धक्कादायक! मीच या मठाचा पुजारी आणि मालक म्हणत धर्मोपदेशकाला लोखंडी गजाने मारहाण
Video – मराठी भाषेचा अन्याय आम्ही सहन करणार नाही – अनिल परब