‘खरंच तू ?’ ‘छावा’ मधील विकी कौशलची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका पाहून आलिया भट्ट थक्क
छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा ‘छावा’चित्रपटाने धुमाकूळ घातला. प्रेक्षकांच्या तोंडी फक्त छावाचं आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करतोय. जगभरात हा चित्रपट 200 कोटीकडे वाटचाल करताना दिसत आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकाराचंही तेवढंच कौतुक केलं जात आहे. विशेष करून विकी कौशलने बदललेलं त्याचं रूप, त्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी घेतलेली ती मेहनत. त्याची भूमिका पाहून सर्वजण थक्क झालेत.
विकीच्या कौतुकाची बॉलिवूड अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
सामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनीच त्याचं कौतुक केलं आहे. त्यात आता अजून एका बॉलिवूड अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल होत आहे. जिला विकीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून विश्वासच बसत नाहीये. विकीच्या चित्रपटातील एक फोटो शेअर करत या अभिनेत्रीने ‘विकी कौशल, तू आहेस का हा?’ असं म्हणत तिने आश्चर्य व्यक्त केलं आहे.
विकीची भूमिका पाहून आलिया भट्टही थक्क
ही अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट. आलिया भट्टनेही या चित्रपटाचे आणि विकी कौशलच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. आलियाने इन्स्टाग्रामवर विकी कौशलच्या अभिनयाचे कौतुक केले. विकीच्या चित्रपटातील एक फोटो शेअर करत त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, “विकी कौशल, तू आहेस का???? ‘छावा’ मध्ये तू केलेल्या भूमिकेबद्दल मी विसरू शकत नाही” असं तिने लिहिलं आहे. विकीने देखील आलियाची ही पोस्ट त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. त्याने “आलिया, खूप खूप धन्यवाद” असं म्हणत त्याने तिचे आभार मानले.

छावा लवकरच 200 कोटींचा टप्पाही पार करणार
छावाची निर्मिती मॅडॉक फिल्म्सने केली आहे. एआर रहमान यांनी चित्रपटात संगीत दिले आहे. हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत 150 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आणि लवकरच हा चित्रपट 200 कोटींचा टप्पाही पार करेल. दरम्यान आजही हा चित्रपट पाहण्यासाठी सर्व थिएटर हे हाऊसफूल असल्याचं दिसून येत आहे.
आलिया भट्ट आणि विकी कौशल लवकरच आगामी चित्रपटात एकत्र
दरम्यान आलिया भट्ट आणि विकी कौशल यांनी ‘राजी’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. आता लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात आलिया आणि विकी एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटात आलियाचा पती तथा अभिनेता रणबीर कपूर देखील दिसणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List