खेतवाडीतील पितळे मारुती मंदिर जसं होतं, तसंच हवंय; बिल्डरची मनमानी आम्ही होऊ देणार नाही! – आदित्य ठाकरे
खेतवाडी क्रमांक 8 मधील तब्बल 150 वर्षे जुने (वारसा स्थळ श्रेणी-2) पितळे मारुती मंदिर पुनर्विकासाच्या नावाखाली पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे मंदिर छोट्या आकारात तसेच आतल्या बाजूस बांधून देण्याचा घाट बिल्डरकडून होत आहे. परंतु आम्हाला खेतवाडीतील पितळे मारुती मंदिर जसं होतं, तसंच हवंय. बिल्डरची मनमानी आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत हिंदुत्वाचा खोटा अजेंडा पुढे रेटणाऱ्या भाजपचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, खेतवाडी क्रमांक 8 मधील तब्बल 150 वर्षे जुने (वारसा स्थळ श्रेणी-2) पितळे मारुती मंदिर पुनर्विकासाच्या नावाखाली पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. अर्थ ग्राफिक्स या कन्स्ट्रक्शन कंपनी तर्फे येथील पुनर्विकास केला जात असून सध्या असलेले हे मंदिर छोट्या आकारात तसेच आतल्या बाजूस बांधून देण्याचा घाट बिल्डरकडून होत आहे. याला भाविकांनी, स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. मात्र, विकासाच्या नावाखाली स्वतःचे खिसे भरू पाहणारे भाजप सरकार स्थानिकांच्या मताचा, त्यांच्या भावनांचा विचार न करताच आपला खोट्या हिंदूत्वाचा अजेंडा पुढे रेटत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
खेतवाडीतील पितळे मारुती मंदिर जसं होतं, तसंच हवंय; बिल्डरची मनमानी आम्ही होऊ देणार नाही! – आदित्य ठाकरे#AadityaThackeray #shivsenaubt pic.twitter.com/LdaPfnuhpO
— Saamana Online (@SaamanaOnline) March 6, 2025
आम्ही भाविकांच्या भावनांशी खेळ होऊ देणार नाही, मंदिराबाबत आम्ही कोणतीही तडजोड होऊ देणार नाही. आम्हाला पितळे मारुती मंदिर जसे आहे, तसेच हवे, बिल्डरची मनमानी होऊ देणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List