रोल किती आणि बोलतो किती; अक्षय खन्नाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यामुळे संतोष जुवेकर ट्रोल
गेल्या काही दिवसापासून एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचे नाव ‘छावा’ असे आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना येसुबाईंच्या भूमिकेत दिसत आहे आणि अभिनेता अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात काही मराठी कलाकार दिसले आहे. अभिनेता संतोष जुवेकरने रायाजी या भूमिकेत दिसत आहे. त्याने एका मुलाखतीमध्ये ‘मी अक्षय खन्नाशी बोललोच नाही’ असे म्हटले. त्यानंतर संतोष जुवेकरला ट्रोल केले जात आहे.
काय म्हणाला होता संतोष जुवेकर?
संतोष जुवेकरने एका वृत्तवाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने शुटिंगचा अनुभव सांगितला. त्यावेळी तो म्हणाला, “छावा सिनेमात ज्यांनी मुघलांच्या भूमिका साकारल्या आहेत त्या कोणाशीच मी बोललो नाही. शूटिंग सुरु असताना मी तरी त्यांच्याशी बोललो नाही. औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाच्या काही सीन्सचे शूटिंग सुरू असताना मी लक्ष्मण सरांना भेटायला गेलो होतो. मी सरांना भेटलो, बोललो आणि निघालो. बाजूला अक्षय खन्ना बसला होता. पण, मी त्याच्याकडे बघितलंपण नाही. माझा काही अक्षय खन्नावर राग नाही. त्याने उत्तमच काम केलं आहे. पण, माहीत नाही का त्यांच्याशी बोलावंसंच मला वाटलं नाही.”
नेटकऱ्यांनी केले ट्रोल
नेटकऱ्यांनी संतोष जुवेकरची ही मुलाखत पाहिली. या मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांनी संतोषला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ‘आपला रोल किती आणि आपण बोलतो किती. किती अतिशयोक्ती… अक्षय खन्ना पेक्षा हाच जास्त इंटरव्ह्यू देतोय’ असे एका यूजरने म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट करत ‘रुबाब केवढा रोल केवढा’ असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने ‘माझीच लाल मित्रमंडळ.. नुसतीच फुगिरी’ अशी कमेंट केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List