“आईवर प्रेम करतो पण..”; वादानंतर रणवीर अलाहबादियाचा व्हिडीओ चर्चेत

“आईवर प्रेम करतो पण..”; वादानंतर रणवीर अलाहबादियाचा व्हिडीओ चर्चेत

प्रसिद्ध युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आला आहे. देशातील काही राज्यांमध्ये त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये आईवडिलांच्या संभोगावरून त्याने एका स्पर्धकाला अत्यंत अश्लील प्रश्न विचारला होता. त्यावरून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. राजकीय नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत अनेकांनी रणवीरवर कारवाईची मागणी केली आहे. या वादादरम्यान रणवीरचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये रणवीर बोलतोय की, तो कधीच एक चांगला मुलगा बनू शकला नाही.

रणवीरच्या एका पॉडकास्टमध्ये UAE चे कोट्यधीश उद्योगपती अंकुर अग्रवाल आले होते. त्यावेळी रणवीरने चांगला मुलगा बनू न शकल्याची खंत व्यक्त केली होती. अंकुर यांनी म्हटलं होतं, “मला वाटतं मी एक चांगला मुलगा बनू शकलो नाही, कारण मी माझ्या आईला पुरेसा वेळ देऊ शकत नाही. आपण आपलं आयुष्य खूपच व्यस्त करून घेतलंय. आईला वेळ देण्याचा मी प्रयत्न करतो. तरी हे कधी माझ्याकडून शक्य होईल माहीत नाही.” अंकुर यांचं हे वक्तव्य ऐकून रणवीरसुद्धा त्याच्या भावना व्यक्त करतो. “ही गोष्ट मलासुद्धा जाणवते”, असं तो म्हणतो. याविषयी रणवीर पुढे सांगतो, “मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो. पण काय करू? मीसुद्धा तिला पुरेसा वेळ देऊ शकत नाही.” रणवीरचा हा जुना व्हिडीओ आता पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

रणवीर अलाहबादियाने नुकत्याच झालेल्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमाच्या एका भागात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावेळी तो परीक्षक म्हणून कार्यक्रमात उपस्थित होता. त्याच्यासह कंटेंट क्रिएटर आशिष चंचलानी, जसप्रीत सिंह आणि अपूर्वा मखिजाही उपस्थित होते. वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियावरून टीका झाली आणि मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. त्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुंबईतील दोन वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी सोमवारी मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रार केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्वारगेट बस स्थानक महिला अत्याचार प्रकरण, एसटी अधिकाऱ्यांवर गंडांतर, परिवहनमंत्र्यांचे आदेश काय स्वारगेट बस स्थानक महिला अत्याचार प्रकरण, एसटी अधिकाऱ्यांवर गंडांतर, परिवहनमंत्र्यांचे आदेश काय
पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात एका महिलेवर अज्ञात व्यक्तीकडून अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे घडली आहे. या प्रकरणाची गंभीर...
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मास्टर प्लॅन, अजितदादांसाठी डोकेदुखी ठरलेला ‘तो’ नेता करणार शिवसेनेत प्रवेश
Photo – स्वारगेट बलात्कारप्रकरणी पुण्यात शिवसेनेचे आक्रमक आंदोलन
प्रशांत कोरटकरला ताब्यात का घेतलं नाही – अंबादास दानवे
छावा चित्रपट सुरू असताना थिएटरमध्ये लागली आग, प्रेक्षकांमध्ये घबराट
अन्नत्याग आंदोलन स्थगित, 5 मागण्या अजूनही पूर्ण नाहीच; धनंजय देशमुख म्हणाले…
सर्वप्रथम कोणत्या अभिनेत्याने साकारली होती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका?