मी काहीही चुकीचं करत नव्हतो…रोहमनने पहिल्यांदाच सुष्मिता सेनसोबतच्या ब्रेकअपबद्दल बरेच खुलासे केले

मी काहीही चुकीचं करत नव्हतो…रोहमनने पहिल्यांदाच सुष्मिता सेनसोबतच्या ब्रेकअपबद्दल बरेच खुलासे केले

मॉडेल आणि अभिनेता रोहमन शॉल आधी सुष्मिता सेनसोबत नात्यामुळे चर्चेत होता आणि आता त्यांच्या झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. दोघेही बराच काळ एकत्र होते, पण नंतर ते वेगळे झाले. मात्र ब्रेकअपनंतरही, दोघेही चांगले मित्र आहेत आणि बऱ्याचदा ते एकत्रही दिसतात. रोहमनचे सुष्मिताच्या दोन्ही मुलींशीही चांगले संबंध आहेत. अलिकडेच त्याने सुष्मितासोबतच्या आणि त्याच्या नात्याबद्दल तसेच आणि ब्रेकअपबद्दलही स्पष्टपणे बोलला आहे.

रोहमनचे सध्या  करिअर आणि स्वतःवर लक्ष

सुष्मितासोबत ब्रेकअप झाल्यानंतर रोहमन शॉल सध्या त्याच्या करिअरवर आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करताना दिसतो. अभिनय क्षेत्रात आल्यानंतर त्याने स्वतःला एका नवीन दृष्टिकोनातून पाहिलं असं त्याचं मत आहे. सध्या, रोहमन आहे आणि सिंगलच असून त्याला त्याचं संपूर्ण लक्ष त्याच्या करिअरवर द्यायचं आहे असं त्याने म्हटलं आहे.

“मी कधीही हा दबाव माझ्यावर येऊ दिला नाही…”

रोहमन शॉलने अलीकडेच एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पहल्यांदाच स्पष्टपणे बोलला आहे. “सुष्मिता सेनसोबत रिलेशनमध्ये असताना सर्वांचच आमच्या नात्याकडे जरा जास्तच लक्ष होतं. पण मी कधीही हा दबाव माझ्यावर येऊ दिला नाही. सुरुवातीला मला त्याचा काही फरक पडला नाही, पण नाते संपल्यानंतर, जेव्हा मी अभिनय क्षेत्रात करायला सुरुवात केली, तेव्हा हेच नातं माझा भावनिक आधार बनलं”

“ती लेजंट व्यक्तिमत्व आहे…”

जेव्हा रोहमनला विचारण्यात आलं की सुष्मितासोबतच्या त्याच्या नात्याबद्दलच्या बऱ्याच अफवा यायच्या,  या चर्चांचा त्याच्यावर कधी काही परिणाम झाला का? तर, यावर तो म्हणाला, “ज्या व्यक्तीशी माझे नाव जोडले गेले आहे ती लेजंट व्यक्तिमत्व आहे. ती माझ्या आयुष्याचा एक भाग होती आणि नेहमीच राहील. मी ती गोष्ट कधीच काढून टाकू शकत नाही. मला या गोष्टीचा अभिमान आहे, कारण मी काहीही चुकीचं करत नव्हतो. एखाद्यावर प्रेम करण्यात काहीच गैर नाही, म्हणून मला कोणत्याही गोष्टीबद्दल वाईट वाटलं नाही आणि आताही वाटत नाही.” असं म्हणतं त्याने त्याच्या आणि सुष्मितासोबतच्या नात्यावर भाष्य केलं शिवाय त्या दोघांचं नात आताही अगदी मैत्रीच आणि प्रेमाचंच असल्याचं त्याने म्हटलं आहे.

रोहमन सध्या सिंगलच

रोहमन पुढे म्हणाला, “मी जसा आहे त्याचा मला स्वतःवर अभिमान आहे. आजही मी त्या नात्याला सुंदर मानतो आणि त्याच्याशी संबंधित कोणत्याही गोष्टीबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही.” पुढे तो म्हणाला की त्याला अजूनही प्रेमावर पूर्ण विश्वास आहे, पण आता आधी करिअर मग प्रेम, हाच फॉर्मुला तो वापरणार आहे. प्रथम त्याला स्वतःला सेट करायचं आहे, मग प्रेम होईलच. रोहमन म्हणतो की सध्या तो पूर्णपणे सिंगल आहे आणि एका नवीन नात्यासाठी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तयार आहे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सर्वप्रथम कोणत्या अभिनेत्याने साकारली होती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका? सर्वप्रथम कोणत्या अभिनेत्याने साकारली होती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका?
छत्रपती संभाजीराजे यांची शौर्यगाथा सांगणारा चित्रपट ‘छावा’ हा सध्या सर्वत्र धुमाकूळ घालतोय. प्रत्येकाच्या ओठांवर फक्त छावाचच नाव आहे. छावा चित्रपट...
Pumkin Seeds Benefits: सकाळी रिकाम्यापोटी ‘या’ बिया खाल्ल्यामुळे आरोग्याला होतील अनेक फायदे…
Herbal Tea Benefits: घरच्या घरी ‘हे’ हर्बल टी ट्राय केल्यास Period Craps होतील दूर…
महायुतीत चाललंय काय? मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी
Blume Ventures Report – गरिबांची गरिबी जाईना, मध्यमवर्गीयांचे खिसे रिकामे मात्र, श्रीमंतांच्या तिजोऱ्या खचाखच; काय सांगतो अहवाल? वाचा…
पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात
रात्री जेवणानंतर तुम्ही फळे खाताय का! फळे खाताना काही गोष्टी लक्षात ठेवा.. वाचा कोणत्या?