प्रवाशांनो कृपया लक्ष द्या..! रेल्वेच्या तिन्हीही मार्गांवर आज मेगाब्लॉक, वेळापत्रक काय?
संपूर्ण मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्हीही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे, तसेच अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक
मुंबई उपनगरीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगाव यादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत हा ब्लॉक असेल. यावेळी जलद मार्गावरील सर्व लोकल या धीम्या मार्गावर चालवल्या जातील. या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन मार्गावरील काही उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच हार्बर मार्गावर गोरेगाव दरम्यान अंधेरी आणि बोरिवली येथून काही गाड्या चालवल्या जातील. ट्रॅक, सिग्नल आणि इतर देखभालीची कामे करण्यासाठी पश्चिम रेल्वेने हा ब्लॉक घेतला आहे.
मध्य रेल्वेचे वेळापत्रक काय?
मुंबई उपनगरीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे मार्गावर ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या कालावधीत गाड्या 10 मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे. सकाळी ०९.३४ ते दुपारी ०३.०३ पर्यंत सीएमएस मुंबईहून सुटणाऱ्या डाउन जलद/सेमी-जलद लोकल सेवा वळवण्यात येतील. ठाणे ते कल्याण स्थानका दरम्यानच्या डाऊन स्लो मार्गावरील गाड्या त्यांच्या संबंधित स्थानकांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. नियोजित वेळेनुसार जलद मार्गावर पुन्हा चालवल्या जातील.
ट्रान्स हार्बर मार्गावरील स्थिती काय?
ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर वाशी/नेरुळ/पनवेल दरम्यान सकाळी ११:४० ते दुपारी ४:१० पर्यंत ब्लॉक असेल. अप दिशेला सकाळी १०:२५ ते सायंकाळी ४:०९ आणि डाउन दिशेला सकाळी १०:३५ ते सायंकाळी ४:०७ पर्यंत रेल्वे सेवा बंद राहतील. अप ट्रान्स-हार्बर लाईनवरील लोकल सेवा पनवेल/नेरुळ/वाशीहून ठाण्याकडे सकाळी १०.२५ वाजता सुटतील आणि नेरुळहून दुपारी ०४.०९ वाजता सुटतील. तर हार्बर लाईनवर ब्लॉक असणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List