‘छावा’ मधील ‘येसूबाईं’च्या लूकसाठी खूप मेहनत; रश्मिकाच्या अंगावरील ही साडी तब्बल 500 वर्ष जुनी
विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘छावा’ चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. चित्रपटाची कथा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला तेव्हा विकीसोबतच औरंगजेबाच्या व्यक्तिरेखेने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. सुरुवातीला लोकांनी त्या अभिनेत्याला ओळखलंच नव्हतं. पण नंतर जेव्हा लक्षात आलं की ही भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय खन्ना आहे तेव्हा मात्र लोकांना नक्कीच आश्चर्य वाटलं होतं.
छावामधील येसूबाईंच्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत
मात्र चित्रपटात सर्वच गोष्टी आणि भूकिांवर अगदी बारकाईने लक्ष दिलं गेलं आहे. तसेच सर्वच कलाकारांच्या भूमिकांसाठी खूप मेहनत घेतली गेली आहे. त्यात रश्मिका मंदान्नाच्या लूकसाठीही बरीच मेहनत घेतली गेली. रश्मिकाने संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाईची भूमिका साकारली. तिच्या लूकवरही बरेच काम करण्यात आलं.
अनेक शहरांना भेटी देऊन साड्यांची माहिती घेतली
‘छावा’च्या निर्मात्यांना केवळ औरंगजेबच नाही तर सर्व पात्रांना पडद्यावर अचूकपणे आणण्यासाठी जवळजवळ 1 वर्ष लागलं. चित्रपटातील पात्रांच्या पोशाखांची संपूर्ण जबाबदारी चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि पोशाख डिझायनर शीतल शर्मा यांनी घेतली होती. यासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, पुणे, नाशिक, पैठण आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांना भेटी दिल्या.
म्यूजियममधील साड्यांचे फोटो घेऊन तशाच साड्या बनवल्या
रश्मिकाने चित्रपटात कोणतीही सामान्य साडी नेसली नव्हती तर पैठण आणि नारायणपेठ येथील साड्या परिधान केल्या होत्या. पूर्वी या साड्या नेमक्या कशा होत्या यासाठी लक्ष्मण उतेकर आणि शीतल यांनी अनेक संग्रहालयांना भेटी दिल्या. अनेक फेऱ्या मारल्या.
चित्रपटात रश्मिकाच्या अंगावर 500 वर्ष जुनी साडी
म्यूजियममधील त्या काळच्या साड्या बनवण्यासाठी साड्यांचे आधी फोटो काढून मग त्या तशाच बनवल्या गेल्या. एवढंच नाही तर चित्रपटामध्ये रश्मिकाने नेसलेल्या एका साडीवर 500 वर्ष जुन्या साडीची बॉर्डर देखील लावण्यात आली आहे. चित्रपटात रश्मिका खूप सुंदर रंगाच्या नऊवारी नेसल्या आहेत.
साड्यांच्या रंगसंगतीबद्दलही केला अभ्यास
रश्मिकासाठी ज्या साड्या बनवण्यात आल्या होत्या त्यांच्या रंगसंगतीबद्दल सांगायचं तर एका रिपोर्टनुसार ऐतिहासिक चित्रपटांमध्ये दाखवलेली पात्रे शक्यतो पांढऱ्या किंवा पेस्टल रंगाच्या कपड्यांमध्येच दाखवले जातात. तथापि, जेव्हा चित्रपटाच्या दिग्दर्शकाने त्याबद्दल वाचायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जुन्या काळात लोक विविध रंगांचे कपडे घालत असत.
लक्ष्मण उतेकर यांनी त्यांच्या संशोधनासाठी अनेक जुने किल्ले, संग्रहालये आणि इतिहासकारांना भेटी दिल्या. रश्मिकाच्या दागिन्यांची रचना देखील संग्रहालयातील दागिनेपाहून तशापद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List