चित्रपट रिलीज होताच थेट 18 देशांमध्ये बॅन; पहिल्यांदा चित्रपट पाहिला अन् प्रेक्षकांची डोकी सुन्न झाली
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी किंवा तो प्रदर्शित होण्यासाठी सेन्सॉर बोर्डाची परवानगी लागते. किमान भारतात तरी तसे नियम लागू आहेत. पण एक चित्रपट असा होता की तो रिलीज झाल्या झाल्या या चित्रपटावर थेट 18 देशांमध्ये या चित्रपट पाहण्यावर बंदी घालण्यात आली. आणि कारण म्हणजे या चित्रपटातील बोल्ड सीन्स. या 18 देशांमध्ये भारताचाही समावेश होता.
18 देशांत ‘हा’ चित्रपट पाहण्यावर बंदी
पुढे हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला. मोजक्याच थिएटरमध्ये रिलीज झालेला हा सिनेमा ओटीटीवर आल्यावर चांगलाच गाजला. सिनेमाचं खूप कौतुक झालं. सिनेमातील बोल्ड सीन्सची मात्र चांगलीच चर्चा झाली. हा चित्रपट कोणता माहितीये का?

सिनेमावर बंदी घालण्याची वेळ का?
2009 साली रिलीज झालेल्या ‘एंटीक्राइस्ट’ नावाचा सिनेमा. लार्स वॉर्न ट्रायर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. सिनेमात विलेम डेफो आणि चार्लोट गेन्सबर्ग हे कलाकार पाहायला मिळाले. या सिनेमाची कहाणी खूपच हटके आणि खोलवर परिणाम करणारी आहे.
एका कपलच्या मुलाचं निधन होतं. या दुःखातून सावरण्यासाठी नवरा-बायको जंगलात पिकनीकला जातात. परंतु परिस्थिती प्रचंड बिघडते. हायपरसेक्शुअल, डीप्रेशन सारख्या आजारांचा सामना करणारी बायको अचानक असं काही करते ज्यामुळे तिच्या नवऱ्याचा विश्वासच बसत नाही.
जंगलात भटकंती करताना कपलचं बदललेलं आयुष्य
चार चाप्टर्समध्ये या सिनेमाच्या कहाणीची विभागणी केली आहे. हळूहळू जंगलात भटकंती करायला आलेल्या जोडप्याचं आयुष्य कसं बदलतं हे या चित्रपटात पाहायला मिळतं. सिनेमा रिलीज झाल्यावर 18 देशांमध्ये या सिनेमांवर बंदी आणण्यात आली.

चित्रपटात दाखवण्यात आलेले बोल्ड सीन आणि काही असे भयानक प्रसंग जे अत्यंत वादग्रस्त ठरले. ते पाहून प्रेक्षकांची डोकी सुन्न झाली होती असं म्हटलं जातं. याशिवाय मानसिक आजार पुढे किती भीषण रुप धारण करतो, हेही या सिनेमात पाहायला मिळतं. अशा बऱ्याच कारणांमुळे सिनेमावर बंदी आणली.
OOT वर चित्रपट उपलब्ध आहे
मात्र ज्यांनी हा सिनेमा पाहिला त्यांना मात्र हा प्रचंड आवडला. ज्यांनी पाहिला त्यांना चित्रपटाचा विषय आवडला तसेच त्यात ज्या विषयावर भाष्य करायचं होतं त् प्रेक्षकांपर्यं पोहोचलं त्यामुळे ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांना त्याची कथा नक्कीच आवडली. IMDB वर सिनेमाला 6.6 इतकी रेटिंग दिली आहे. हा सिनेमा इंग्रजी भाषेत प्राइम व्हिडीओ या ओटीटीवर उपलब्ध आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List