Manisha Koirala: ‘या’ बी-ग्रेड सिनेमात मनिषाचे बोल्ड सीन, अभिनेत्रीवर झालेली टीका आणि…

Manisha Koirala: ‘या’ बी-ग्रेड सिनेमात मनिषाचे बोल्ड सीन, अभिनेत्रीवर झालेली टीका आणि…

Manisha Koirala: अभिनेत्री मनिषा कोईराला हिने कायम एकापेक्षा एक सिनेमात दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. करीयर यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्रीने अशा सिनेमात काम केलं ज्यामुळे मनिषाला टीकेचा सामना करावा लागला. 2002 मध्ये मनिषा हिने ‘लव्ह स्टोरी’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली होती. 2 तास 2 मिनिटांच्या सिनेमात कपडे आणि बोल्ड सीनमुळे अभिनेत्रीचा सर्वच स्तरातून विरोध झाला होता.

मनिषा हिच्यासारख्या अभिनेत्रीने अशा सिनेमात काम करणं अनेक चाहत्यांना रुचलं नाही. त्यामुळे अभिनेत्रीला टीकेचा सामना करावा लागला होता. दिग्दर्शक शशिलाल के नायर दिग्दर्शित सिनेमात मनिषा कोईराला हिच्यासोबत आदित्य सील, सरोज भार्गव आणि रणवीर शौरी यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

सिनेमाची कथा एका तरुण मुलाच्या भोवती आधारलेली आहे. जो त्याच्या समोरच्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या महिलेकडे आकर्षित होतो. तो गुप्तपणे दुर्बिणीतून तिच्याकडे पाहतो आणि तिच्या हालचालींवर लक्ष ठेवतो. त्याचा मोह इतका वाढतो की त्याला सतत तिच्याभोवतीच राहावेसे वाटते.

पण एक दिवस असा देखील येतो, जेव्हा त्या महिलेला तरुण मुलगा दुसऱ्या पुरुषासोबत पाहतो… तेव्हा त्या तरुणाला मोठा धक्का बसतो. सिनेमात मनिषा महत्त्वाच्या भूमिकेत होती. सिनेमात अभिनेत्रीने अनेक बोल्ड सीन दिले आहेत. ज्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली होती.

मनिषाच्या बोल्ड सीनमुळे त्यावेळी बराच वाद निर्माण झाला होता. सिनेमातील काही सीन्स इतके बोल्ड होते की ते कुटुंबासह पाहण्यासारखे नव्हते. दीड कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या छोट्याशा प्रेमकथेला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या.

मनिषा कोईराला हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री आता रुपेरी पडद्यापासून दूर असली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बॉलिवूडवर स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर मनिषाने ‘हीरामंडी’ सीरिजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. सीरिजमधील मनिषाच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.

सोशल मीडियावर देखील मनिषा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुतारी वाजवून नरेंद्र राणे परतीच्या वाटेवर, हातावर बांधणार घड्याळ, अजितदादांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केव्हा? तुतारी वाजवून नरेंद्र राणे परतीच्या वाटेवर, हातावर बांधणार घड्याळ, अजितदादांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केव्हा?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नरेंद्र राणे परतीच्या वाटेवर आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकत थोरल्या पवारांच्या...
छावा चित्रपटाचे हृदयाला भिडणारे डायलॉग लिहिणारा मुस्लिम लेखक कोण? घेतलं नाही एकही रुपयाचं मानधन
पंतप्रधानांचं कौतुक केलं तर भक्त, गर्वाने हिंदू आहोत म्हटलं तर…, प्रितीने झिंटाने कोणावर साधला निशाणा?
विराट आता इज्जतीचा प्रश्न आहे…; भारत- पाकिस्तान सामन्यापूर्वी अभिनेत्रीने केले आवाहन
विकी-रश्मिका नव्हते ‘छावा’साठी पहिली पसंती, या सुपरस्टाने दिला होता सिनेमाला नकार
जीबीएस आजार आणि कोंबड्यांचा संबंध तपासणार
पालिकेच्या आदर्श रस्त्यांची लागणार वाट