‘छावा’ सिनेमातील ॲक्शन सीनमधील ‘त्या’ चुका, नसतील आल्या कोणाच्या लक्षात…
Chhaava: दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या ऐतिहासिक सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. सिनेमातील काही डायलॉग आणि सीन चाहत्यांना प्रचंड आवडले आहे. 14 फेब्रुवारी रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ सिनेमाने अनेट हीट सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत. सिनेमाने आतापर्यंत देशात 165 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. तर जगभरात सिनेमाने 200 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. पण प्रभावी कलाकार, उत्कृष्ट दिग्दर्शक आणि उत्कृष्ट संगीतकार असूनही, सिनेमात काही चुका होत्या ज्या अनेकांच्या लक्षात देखील आल्या नसतील…
सिनेमाच्या ॲक्शन सीनमधील पहिली चूक म्हणजे, एका सीनमध्ये स्पष्ट दिसत आहे की, तलवार मानेत घुसलेली नसून दुसऱ्या बाजूने बाहेर निघाली. ही चूक फार कोणाच्या लक्षात आली नसेल.
ॲक्शन सीनमधील दुसरी चूक म्हणजे, सीनमध्ये एका योद्धावर तलवारीने हल्ला होतो. मृत्यूपावणारा व्यक्ती मान वाकडी करत हातात तलवार धरताना दिसत आहे. सीन पाहिल्यानंतर तो सीन दिग्दर्शत संजय लिला भन्साळी यांनी बनवलेला वाटत आहे…
सांगायचं झालं तर, ‘छावा’ सिनेमा फक्त सीनमधील चुकांमुळे नाही तर, वादग्रस्त कारणांमुळे देखील चर्चेत आला. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, त्यातील एका दृश्यावरून विविध स्तरांतून आक्षेप घेण्यात आला होता. छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणाी येसूबाई यांचा लेझीम नृत्य करतानाचा हा प्रसंग होता. अखेर सिनेमातून लेझीम नृत्य करतानाचा सीन वगळ्यानंतर सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला.
संभाजी ब्रिगेड आणि इतिहास संशोधकांनी घेतला आक्षेप…
संभाजी ब्रिगेड आणि इतिहास संशोधकांनी चित्रपटातील ऐतिहासिक विकृतीकरणावर आक्षेप घेतला आहे. संभाजी महाराज आणि सोयराबाईंबाबत चुकीचे प्रसंग दाखवल्याचा आरोप संभाजी ब्रिगेड आणि इतिहास संशोधकांनी केला आहे. याबाबत सेन्सॉर बोर्डाकडे निवेदन सादर करण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे.
योग्य पडताळणी न करता मंजुरी दिल्याची तक्रार देखील केली आहे. शिवाय ओटीटी आणि अन्य माध्यमांवर प्रदर्शन रोखण्यासाठी कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे. आता याप्रकरणी पुढे काय होत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List