अंकिता लोखंडेने शोमध्ये सर्वांसमोर नवरा विकीच्या कानाखाली लगावली; म्हणाली “माझ्यावर प्रेम लादलं…”
हिंदी टेलिव्हिजन मधली प्रसिद्ध जोडी म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा नवरा विकी जैन. बिग बॉसमध्ये येण्याआधीही ही जोडी त्यांच्या व्हिडीओद्वारे फेमस होतीच पण बिग बॉसमुळे या जोडीतील नात्याच्या अनेक बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. त्यानंतर ही जोडी रिअॅलिटी शो ‘लाफ्टर शेफ’मध्ये दिसली. त्या शोमध्ये या जोडीला बरीच पसंती मिळाली. अंकिता आणि तिचा नवरा विकीमधील प्रेम, गोड भांडणही प्रेक्षकांना पाहयला मिळालं.
‘लाफ्टर शेफ शो’ सीझन 2मध्ये अंकिता-विकीची पुन्हा धम्माल
आता ही जोडी ‘लाफ्टर शेफ शो’च्या सीझन 2 मध्येही प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. पहिल्या भागातील त्यांच्यातील केमेस्ट्री प्रेक्षकांना फारच मनोरंजक वाटली होती. अताच्या सीझनमध्येही या जोडीतील नोक-झोक पाहायला मिळत आहे. या शोदरम्यान एक किस्सा घडला आहे. ज्यात यांच्यातील भांडण-प्रेम दिसत आहे. एका एपिसोडमध्ये विकी असं काही बोलून जातो की अंकिता थेट त्याला कानाखाली मारते. हा व्हिडीओ सध्या व्हायरलही होत आहे.
“भांडण देखील प्रेमाचा एक भाग”
तो किस्सा असा आहे, जेव्हा शोची होस्ट भारती सिंग विकीला विचारते की त्याच्यासाठी प्रेम म्हणजे काय, तेव्हा अंकिताने म्हणते की, “प्रेम ही खूप सुंदर गोष्ट आहे. त्यातही भांडण आहे.” त्यावर कृष्णा तिला थांबवतो आणि म्हणतो की, “तू चुकीचं बोलतेस प्रेमात मारामारी देखील होते. हे ऐकून विकी खूप हसतो, पण अंकिता म्हणते की त्यांचे भांडण देखील प्रेमाचा एक भाग आहे.”
“या म्हाताऱ्याचे प्रेम माझ्यावर लादले गेले आहे”
मग यावर विकी म्हणतो की, “बऱ्याचदा मला असं वाटतं की कदाचित आमच्यात हे प्रेम कधी घडलंच नाही, ते माझ्यावर लादलं गेलं होतं” हे ऐकून अंकिताला राग येतो आणि ती सेटवरून निघून जाण्याचं नाटक करते आणि म्हणते की “मी जाते इथून निघून. तू जा विकी, प्रेम तुझ्यावर लादले गेल आहे ना.” यावर विकी म्हणतो “तू काहीही बोल, बाळा. तू प्रेम लादलेस का? अंकिता पुन्हा हसते आणि म्हणते की या म्हाताऱ्याचे प्रेम माझ्यावर लादले गेले आहे.”
अन् अंकिता विकीला कानाखाली मारते.
त्यानंतर कृष्णा अंकिताला एक बूट आणून देतो आणि म्हणतो की “विकीच्या जेवण्याची वेळ झाली आहे त्याला मार फेकून”, अंकिता मग विकीवर बूट फेकून मारते आणि ती गंमतीने विकीच्या कानाखाली मारते. ती जेव्हा विकीच्या कानाखाली मारते तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटतं आणि सर्व ओरडायला लागतात. शोच्या या एपिसोडचा हा चंक व्हायरल झाला आहे आणि सर्वांना हा एपिसोड पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List