HSC Exam 2025 – लातूर जिल्ह्यात 100 केंद्रांवर बारावीची परीक्षा सुरू, कॉपीमुक्त परीक्षेसाठी बैठे पथक तैनात

HSC Exam 2025 – लातूर जिल्ह्यात 100 केंद्रांवर बारावीची परीक्षा सुरू, कॉपीमुक्त परीक्षेसाठी बैठे पथक तैनात

लातूर जिल्ह्यातील 100 परीक्षा केंद्रांवर आजपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरू झाली असून, एकूण 37062 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी यावर्षी सर्व परीक्षा केंद्रांवर बैठे पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच परीक्षा कामकाजावर संनियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेकडून येथे स्वतंत्र कंट्रोल रूम स्थापन करण्यात आले आहे.

या कंट्रोल रूममधून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वलांडी, देवणी, बोरी आणि रेणापूर येथील परीक्षा केंद्रांवर तैनात बैठे पथकांशी संवाद साधला. तसेच कॉपीमुक्त परीक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सतर्क राहून काम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शहरातील काही परीक्षा केंद्रांना भेटी देवून जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी परीक्षा प्रक्रियेची पाहणी केली.

इयत्ता बारावी परीक्षेसाठी 100 परीक्षा केंद्रांसाठी प्रत्येकी तीन सदस्य असलेली 100 बैठे पथक आणि 90 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. यासोबतच परीक्षा केंद्रांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी स्वतंत्र व्हीवर्स टीम गठीत करण्यात आल्या आहेत.

पोलीस अधीक्षकांकडून परीक्षा केंद्राची पाहणी

सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूरमधील विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पुरविण्यात आलेला बंदोबस्त, तसेच परीक्षा केंद्राची पाहणी केली.

लातूर जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर आजपासून बारावीची परीक्षा 12 वी च्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. सदरची परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीतपणे पार पाडावी. यासाठी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, तसेच लातूर जिल्हा पोलीस दल प्रयत्नशील आहे. पोलीस अधीक्षकांनी केंद्रावरील पोलीस बंदोबस्त व शिक्षण मंडळाकडून करण्यात आलेल्या नियोजनाची पाहणी करून सूचना दिल्या.

सदर परीक्षा बंदोबस्ताकरिता 100 पोलीस अधिकारी, 205 पोलीस अंमलदार तर 900 पुरुष होमगार्ड आणि 100 महिला होमगार्ड यांना तैनात करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘छावा’मध्ये कान्होजीच्या भूमिकेत पती सुव्रतला पाहून सखी म्हणाली, ‘तुझा द्वेष करावा की..’ ‘छावा’मध्ये कान्होजीच्या भूमिकेत पती सुव्रतला पाहून सखी म्हणाली, ‘तुझा द्वेष करावा की..’
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाने कमाईचे...
ऐश्वर्याच्या ‘या’ सवयीचा प्रचंड त्रास होतो….अखेर अभिषेकने स्पष्टच सांगितलं
‘छावा’च्या विरोधात जितकं बोलाल तितकंच…, सिनेमाचा विरोध करणाऱ्यांना ॲक्शन दिग्दर्शकाने चांगलंच सुनावलं
“पुढच्या जन्मी असा नवरा नकोच..”; गोविंदाबद्दल पत्नी सुनिता स्पष्टच बोलली..
Govinda : गोविंदा-सुनीताच्या घटस्फोटाच्या चर्चेने खळबळ, अखेर जवळच्या व्यक्तीने सांगितलं सत्य
लोणावळ्यात साकारणार ‘ग्लास स्कायवॉक’, प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर; शंभर कोटींचा खर्च अपेक्षित
कोथरूडचे बीड होण्यापासून वाचवा… फ्लेक्सद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र