चाळीशीनंतर आहारामध्ये हाडांच्या मजबुतीसाठी ‘या’ पदार्थांचा समावेश करा!

चाळीशीनंतर आहारामध्ये हाडांच्या मजबुतीसाठी ‘या’ पदार्थांचा समावेश करा!

महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता ही फार मोठ्या प्रमाणावर दिसून येते. त्यामुळेच अवघ्या चाळीशीच्या जवळपास पोहोचताना हाडांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आहारामध्ये योग्य त्या पद्धतीने कॅल्शियमचा समावेश असणे गरजेचे आहे.

आहारातून पुरेसे कॅल्शियम न मिळाल्यास आपण ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टियोपेनिया आणि कॅल्शियमची कमतरता (पोपॅलेसीमिया) आजार होण्याची शक्यता वाढवतात. कॅल्शियममुळे स्नायूंमधील शिथिलता तसेच रक्तसंचय योग्यरीतीने होण्यास मदत होते. म्हणूनच आवश्यक प्रमाणात कॅल्शियम सेवन करायलाच हवे. सामान्य व्यक्तींसाठी दररोज 1 हजार ते दीड हजार मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. वृद्ध व्यक्तींनी त्यांच्या हाडांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि ऑस्टिओपोरोसिस रोखण्यासाठी अधिक कॅल्शियमची आवश्यकता असते. वयोमानापरत्वे हाडांची झीज ही मोठ्या प्रमाणावर होते. आपल्या आहारात अतिरिक्त कॅल्शियम ठेवणे हे कॅल्शियमच्या कमतरतेवर उपचार करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी सर्वात सुरक्षित उपाय आहे.

कॅल्शियमचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ

दूध, चीज आणि दह्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वाधिक असते. म्हणूनच दिवसातून एकदा तरी या पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

रोज सकाळी बदाम खाणे किंवा बदाम दूध पिणे हा एक उत्तम कॅल्शियमचा स्त्रोत मानला जातो.

सोयाबीनपासून तयार झालेल्या टोफूमध्येही कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे टोफूचा आहारात आठवड्यातून एकदा तरी समावेश करावा. कॅल्शियम वाढीसाठी सोया दूध हाही एक उत्तम पर्याय आहे.

हिरव्या पालेभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आढळते. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

गुळ चणे हा कॅल्शियमचा एक भन्नाट पर्याय आहे. रोज एक गुळाचा खडा आणि थोडे चणे खाल्ल्यास आपली हाडे मजबूत होण्यास मदत होते.

 

(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“या वयात लोकांचं डोकं फिरतं…” गोविंदासोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पत्नी सुनीताचे मोठे विधान “या वयात लोकांचं डोकं फिरतं…” गोविंदासोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पत्नी सुनीताचे मोठे विधान
बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा हे दोघेही सध्या चर्चेत आहेत. गोविंदा आणि सुनीता अहुजा लग्नाच्या 37 वर्षांनी...
वजन कमी करायचंय? मग प्या हे ड्रिंक्स; महिन्याभरात वजन कमी
अमेरिकेने 4 हिंदुस्थानी कंपन्यांवर घातली बंदी; काय आहे कारण? वाचा…
Jalna News – चारही पाय तोडलेला नर बिबट्या मृतावस्थेत आढळला, परिसरात खळबळ
Mumbai Metro 3 चा फज्जा, एका फेरीत सरासरी फक्त 46 प्रवासी! रिकाम्या गाड्या अन् प्रवाशांची वाणवा
राज्य सरकारी १७ लाख कर्मचाऱ्यांची होळी आधीच दिवाळी, महागाई भत्त्यात झाली इतकी वाढ,पाहा काय झाला निर्णय
जयंत पाटील बावनकुळेंना का भेटले? आतली बातमी समोर