‘त्याने बोलावे आंबेडकर आमचे बाप आहेत म्हणून मग…,’ काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी महापुरुषांवर वादग्रस्त विधाने करण्याचा सपाटा सुरुच ठेवला आहे. त्यांनी आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटकेवरुन वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर आता डॉ. बाबासाहेब यांच्याबद्दलही वादग्रस्त विधाने करीत आहेत. या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाज यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ते यावेळी म्हणाले की हे बोलण्याची हिंमत कुठून करत आहेत? आपण तर त्याला उधड धमकी दिली आहे तो जिथे कुठे असेल त्याला मारणार म्हणून…आम्ही संविधान मानणारी माणस आहोत पण जर त्याने पातळी आत्ता ओलांडली आहे…त्याने बोलाव ना आंबेडकर हे आमचे बाप आहेत म्हणून आम्ही त्याला सोडून टाकू..पण यांच्या डोक्यात मनुवाद आहे. त्यामुळे त्याच्या डोक्यावर कधी अंडा फुटेल हे सांगता येत नाही अशी टीकाही आव्हाड यांनी केली आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्याच आहे, जर तुम्ही मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी असे एकीकडे तुम्ही बोलत आहात, दुसरीकडे सुर्यवंशी प्रकरणात पोलिसांना वाचवा म्हणत आहात. त्यामुळे दोन्ही हत्येमधील आरोपींना ही फाशी झालीच पाहिजे. असे कुणाला माफ करता येत नाही . मग तर जेलमधील हत्येमधील सर्व आरोपींना सोडलं पाहिजे मग असे मुख्यमंत्र्यांना सांगा असा सल्लाही आव्हाड यांनी दिला आहे. सुरेश धस या प्रकरणात राजकारण करत आहेत. मग या न्यायाने वाल्मिक कराड याला सुद्धा सोडलं पाहिजे का? असाही सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहेत.
राज ठाकरे आणि फडणवीस भेट
राज ठाकरे यांचं बोलण लोकांना अपिल होत त्यामुळे त्यांनी आत्ता विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात जी भूमिका मांडली होती त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री गेले असतील राज यांच्या भेटीला असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. शिवसेना शिंदे गटाला शह देणं आता काही गरज उरली आहे का?असा प्रश्न आहे या निकालामुळे निर्माण झाल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद्र नार्वेकर आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, अंबादास दानवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले आहेत. यावर आव्हाड यांना विचारले असता त्यांनी, मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकते. आपल्या कामाकरीता त्यामुळे कोणी भेटल तर त्यात गैर नाही असे सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List