आधी गुगल मॅपमुळे शेतात पोहचले, मग मदतीसाठी आलेले तरुण लुटून पळाले
हल्ली अचूक ठिकाण शोधण्यासाठी गुगल मॅपचा वापर केला जातो. मात्र हाच गुगल मॅच कधी कधी संकटात नेऊ शकतो याचे उदाहरण देणारी घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये घडली आहे. गुगल मॅपवर मित्राच्या घरचा रस्ता शोधताना दोन तरुण एका शेतात पोहचले. यानंतर मदतीसाठी आलेल्या तरुणांनी दोघांना लुटले. तरुणांची कार, मोबाईल लुटून फरार झाले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपींचा शोध सुरू आहे.
पीडित तरुण मेरठचे रहिवासी असून मित्राला भेटण्यासाठी कारने मुझफ्फरनगरला चालले होते. दोघांनी मित्राचे लोकेशन मागवले. दोघेही गुगल मॅपच्या सहाय्याने मुझफ्फरनगर आणि सहारनपूर सीमेवर पोहचले. त्यानंतर गुगल मॅपने त्यांना थेट गव्हाच्या शेतात नेले. शेतात त्यांची कार फसली. दोघांनी बरेच प्रयत्न करूनही शेतात अडकलेली कार बाहेर काढू शकले नाही.
तरुणांनी बाईकवरून चाललेल्या दोन तरुणांकडे मदत मागितली. बाईकवरून आलेल्या दोघांनी तिसऱ्याला बोलावून शेतात अडकलेली कार बाहेर काढून हायवेपर्यंत आणली. कार हायवेनर येताच आरोपी कार घेऊन पळून गेले. पीडित तरुणांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List