सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय का मिळू द्यायचा नाही? विजय वडेट्टीवार यांचा सुरेश धस यांना सवाल
एकीकडे सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी काढण्यात आलेल्या मोचर्चा सुरेश धस सहभागी होतात आणि दुसरीकडे म्हणतात की पोलिसांवर गुन्हे दाखल करू नका. भाजप आमदार पोलिसांना क्लिनचीट का देत आहे? सोमनाथ सूर्यवंशी यांच्या जीवाची किंमत नाही का? असा सवाल काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून भाजप आमदार सुरेश धस यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुरेश धस हे पोलिसांवर गुन्हे दाखल करणे संयुक्तिक ठरणार नाही, असे म्हणताना दिसत आहेत. याचाच आधार घेत वडेट्टीवार यांनी सुरेश धस यांना सवाल केला आहे.
हा व्हिडिओ बघा! भाजपचे आमदार सुरेश धस यांचा दुटप्पीपणा. एकीकडे सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात सुरेश धस सहभागी होतात आणि दुसरीकडे म्हणतात की पोलिसांवर गुन्हे दाखल करू नका. भाजप आमदार पोलिसांना क्लिनचीट का देत आहे? सोमनाथ सूर्यवंशी यांच्या जीवाची किंमत नाही का? एका आईने आपला मुलगा आणि कुटुंबाने आधार गमावला आणि पोलिसांना फक्त सुनावले म्हणून सोडून द्यायचे? हा न्याय असू शकतो का? सुरेश धस यांना परभणी प्रकरणात सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय का मिळू द्यायचा नाही? असे ट्विट वडेट्टीवार यांनी केले आहे.
हा व्हिडिओ बघा!
भाजपचे आमदार सुरेश धस यांचा दुटप्पीपणा.एकीकडे सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी काढण्यात आलेल्या मोर्च्यात सुरेश धस सहभागी होतात. आणि दुसरीकडे म्हणतात की पोलिसांवर गुन्हे दाखल करू नका..भाजप आमदार पोलिसांना क्लिनचीट का देत आहे?
सोमनाथ सुर्यवंशी यांच्या… pic.twitter.com/RLJDScEx5k— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 10, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List