डिजिटल फ्रॉड रोखण्यासाठी आरबीआयचे पुढचे पाऊल, बँक डॉटइन आणि फिन डॉटइन सुरू करण्याची घोषणा
भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी मोठी घोषणा केली. देशात मोठय़ा प्रमाणात वाढलेल्या डिजिटल गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आरबीआयने बँक डॉटइन आणि फिन डॉटइन नावाचे डोमेन सुरू करण्याची घोषणा केलीय. यात बँक डॉटइन भारतीय बँकेसाठी एक्सक्लुसिव्ह इंटरनेट डोमेन असेल. तर फिन डॉटइन आर्थिक क्षेत्रातील बिगर बँकिंग कंपन्यांसाठी असेल. या दोन्हींचा उद्देश एकच, तो म्हणजे सायबर सिक्योरिटीमधील धोका आणि फिशिंगसारख्या घटना कमी करणे होय. देशात सुरक्षित फायनान्स सर्व्हिसेससाठी चांगले वातावरण तयार करणे, ज्यात डिजिटल बँकिंग आणि पेमेंट सर्व्हिसेससाठी लोकांचा विश्वास संपादन करण्यासोबतच कोणत्याही चिंतेशिवाय डिजिटल व्यवहार करणे होय. आरबीआयच्या गव्हर्नरने म्हटले की, इंस्टिटय़ूट फॉर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन बँकिंग टेक्नोलॉजी विशेष रजिस्ट्रारच्या रूपाने काम करेल.
लोकांचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे
सध्या अनेक ग्राहकांचा ऑनलाइन ट्रांजॅक्शनवरून विश्वास उडाला आहे. त्यांच्या मनात भीती असते. लोकांचा उडालेला विश्वास पुन्हा एकदा मिळवण्यासाठी आरबीआयकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी हे सर्व केले जात आहे. डिजिटल देवाणघेवाणीसाठी सुरक्षा असणे महत्त्वाचे आहे.
nयाची सुरुवात एप्रिल 2025 पासून केली जाणार आहे. बँकांसाठी निर्देश वेगळ्या पद्धतीने जारी केले जातील. तसेच वित्तीय क्षेत्रात अन्य बिगर बँकिंग कंपन्यासाठी एक विशेष डोमेन फिन डॉटइन ठेवण्याची योजना बनवण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List