288 घंटागाडी कर्मचाऱ्यांना ‘सर्वोच्च’ दिलासा, महापालिका सेवेत होणार समावेश

288 घंटागाडी कर्मचाऱ्यांना ‘सर्वोच्च’ दिलासा, महापालिका सेवेत होणार समावेश

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि कंत्राटी घंटागाडी कर्मचारी यांच्यात सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेला वाद अखेर सुटला आहे. न्यायालयाने दोन्हीकडील याचिका फेटाळून लावत, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे. त्यामुळे 288 घंटागाडी कर्मचाऱ्यांना 18 ऑगस्ट 2005 पासून महापालिका सेवेत सामावून घेतले जाणार आहे, तर त्यांना 31 जानेवारी 2023 पासूनचा रकमेचा फरक मिळणार आहे.

महापालिकेने सन 1997, 1998, 1999 या तीन वर्षांत शहराच्या स्वच्छतेसाठी टप्प्याटप्प्याने 353 घंटागाडी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. प्रदीर्घ सेवेनंतर आम्ही महापालिकेचे कामगार आहोत. आम्हाला कायम करून आम्हाला आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व सुविधा मिळाव्यात, ही मागणी त्या कर्मचाऱ्यांनी केली. त्यासाठी अनेक आंदोलने झाली. घंटागाडी कर्मचारी हे कामगार नसून ठेकेदार आहेत, अशी भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली. त्या विरोधात कामगारांनी औद्योगिक न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निर्णय दिला. महापालिकेने त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले. कामाला लागल्यापासूनची एका वर्षाची फरकाची रक्कम व आरोग्य कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन आणि सुविधा देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला.

या निर्णयाविरोधात महापालिका आणि घंटागाडी कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने उच्च न्यायालय व औद्योगिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून, दोन्हीच्या याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळे घंटागाडी कर्मचाऱ्यांना 18 ऑगस्ट 2005 पासून महापालिका सेवेत सामावून घेतले जाणार आहे, तर 31 जानेवारी 2023 पासूनची फरक रक्कम दिली जाणार आहे. घंडागाडी कर्मचाऱ्यांच्या बाजूने अॅड. चंद्रहार सिंग, अॅड. नितीन कुलकर्णी तसेच अॅड. वैशाली सरिन यांनी काम पाहिले.

74 कर्मचाऱ्यांचा मृत्यू; 5 अनुकंपा तत्त्वावर

घंटागाडी कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 353 आहे. यापैकी 74 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 5 जण अनुकंपा तत्त्वावर काम करीत आहेत. सध्या 288 जण घंटागाडी कर्मचारी म्हणून काम करीत आहेत. त्या सर्वांना न्यायालयाच्या निर्णयाचा लाभमिळणार आहे. तसेच निवृत्ती वेतनही लागू होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय लागल्याने कर्मचाऱ्यांनी पिंपरी चौकात आनंदोत्सव साजरा केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दहावी पेपर फुटीप्रकरणी शालेय शिक्षण मंत्र्यांची महत्वाची माहिती, नेमका काय घडला प्रकार? दहावी पेपर फुटीप्रकरणी शालेय शिक्षण मंत्र्यांची महत्वाची माहिती, नेमका काय घडला प्रकार?
SSC Paper Leak 2025: दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठी विषयाचा पेपर राज्यातील काही शहरांमध्ये फुटला. या पेपर फुटी प्रकरणाची गंभीर...
‘मला हलक्यात घेऊ नका, मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता…’; एकनाथ शिंदेंचा नेमका कोणाला इशारा?
पालघरमध्ये भीषण अपघात, मुख्यध्यापकानं दारूच्या नशेत आठ वाहनांना उडवलं
VIDEO: पूनम पांडेला भररस्त्यात जबरदस्तीने KISS करण्याचा प्रयत्न, प्रचंड घाबरलेल्या पूनमने फॅनला दिला धक्का
“काका खूप…”; शरद पोंक्षेंनी ‘छावा’बद्दल केलेल्या व्हिडीओवर चित्रपटातीलच एका अभिनेत्याची कमेंट
तुम्हीपण रात्री उशिरा झोपता? वेळीच व्हा सावध, वाढू शकतो या आजारांचा धोका
माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द करून राज्यपालांनी त्यांची हकालपट्टी करावी, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी