SSC Exam 2025 – पहिल्याच दिवशी जालन्यात मराठीचा पेपर फुटला? जिल्हाधिकारी म्हणतात, असा कोणताही प्रकार झालेला नाही

SSC Exam 2025 – पहिल्याच दिवशी जालन्यात मराठीचा पेपर फुटला? जिल्हाधिकारी म्हणतात, असा कोणताही प्रकार झालेला नाही

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली. पण परीक्षेच्या पहिल्याच दिवशी जालन्यात सरकारच्या कॉपीमुक्त परीक्षा धोरणाला हरताळ फासला गेल्याची चर्चा आहे. जालन्यातील बदनापूर शहरात जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रावर मराठीचा पेपर फुटल्याची चर्चा आहे. मात्र, या प्रकरणी जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी व्हिडिओ जारी करत स्पष्टीकरण दिले आहे. बदनापूर तालुक्यात किंवा तिथल्या केंद्रावर पेपरफुटीचा असा कोणाताही प्रकार झालेला नाही, असे जिल्हाधिकारी पांचाळ म्हणाले आहे.

पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्या. शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा प्रकार बदनापूरमध्ये घडल्याचे बोलले जात आहे. पेपर फुटल्याचे वृत्त पसरताच शिक्षणाधिकाऱ्यांसह तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी परीक्षा केंद्रावर ठाण मांडून बसले. संबंधितांकडून अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांनी स्पष्ट केले.

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाळेच्या परीक्षा केंद्रांवर पेपर फुटल्याची चर्चा आहे. त्यासह मंठा तालुक्यातील तळणी परीक्षा केंद्रांवरही गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांकडून परीक्षा केंद्रांवर तपासणी करण्यात आली. याबाबतचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. आता शिक्षण विभागाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर कारवाई होणार

परीक्षा केंद्रावरती सोशल मीडियावर प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याची माहिती मिळाली. याबाबत परीक्षा केंद्र संचालक, पर्यवेक्षक यांच्याकडे माहिती मागवली असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. दोषींवर विभागीय शिक्षण मंडळाच्या शिक्षा सूचीनुसार बडतर्फ करणे, फौजदारी गुन्हा दाखल करणे, मंडळ मान्यता रद्द करणे अशा प्रकारची कारवाई होऊ शकते, असे छत्रपती संभाजीनगर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिव डॉ. वैशाली जामदार यांनी सांगितले. दरम्यान, बदनापूरमधील पेपरफुटीच्या चर्चांवर जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सष्टीकरण दिले आहे.

पेपरफुटीचा कोणताही प्रकार झालेला नाही- जिल्हाधिकारी

दहावीचा पेपर फुटला आणि त्याची उत्तरपत्रिका तयार करून देण्यात आली अशी, बातमी माध्यमांकडून दिली गेली. त्या बातमीत तथ्य नाही. याबाबत तपासणी करण्यात आली. व्हॉट्सअ‍ॅपवर जे सर्क्युलेट करण्यात आलं तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही. अशा पद्धतीची कोणतीही घटना तिथे घडलेली नाही. तिथे एक-दोन पालकांनी दगड फेकले होते. त्यासंबंधी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. जालन्यामध्ये सर्वच केंद्रांवर कडक बंदोबस्त आणि परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी बंदोबस्त करण्यात येत आहे. पेपरफुटीचा कोणताही प्रकार केंद्रावरती किंवा तालुक्यात झालेला नाही.

– डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी, जालना

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

500 वर्षांपूर्वीचा हिंदूंचा काल्पनिक छळ… म्हणणाऱ्या अभिनेत्रीचं दुसरं ट्विट, शिवछत्रपतींबद्दल काय म्हणाली? 500 वर्षांपूर्वीचा हिंदूंचा काल्पनिक छळ… म्हणणाऱ्या अभिनेत्रीचं दुसरं ट्विट, शिवछत्रपतींबद्दल काय म्हणाली?
अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमा सध्या तुफान चर्चेत आहे. चाहत्यांमध्ये आणि सोशल...
सिनेमा मराठीत का बनवला नाही? स्क्रिप्ट चांगली नाही; ‘छावा’ सिनेमावर मराठमोळ्या अभिनेत्रीची टीका
‘छावा’ सिनेमाला यश, विकी कौशल पोहोचला 300 वर्ष जुन्या शिव मंदिरात, असं केल्यानं पूर्ण होतात सर्व मनोकामना
‘तो बॅटिंग करत नव्हता तरीही…’, धनश्रीने उघड केलं युजवेंद्र चहलचं ते सीक्रेट
नगर अर्बनच्या घोटाळ्यातील आरोपी अजूनही मोकाट कसे? मुख्यमंत्र्यांनी कडक पावले उचलली पाहिजेत
अहिल्यानगरमध्ये अतिक्रमण हटाव सुरूच राहणार! दोन हजारांचा दंड करणार
वाईतील दोघांनीच दिली मुंबईतील चोरट्यांना टीप,सराफ बाजारातील चोरीचे गुढ उकलले; चौघांना अटक