‘संतोष देशमुख प्रकरण आम्ही दाबू देणार नाही, समाज आमच्या…,’ काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरण आम्ही दाबू देणार नाही, समाज आमच्या बाजूने आहे असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत आहे, न्यायासाठी वणवण फिरत आहे.या प्रकरणात लवकरात लवकर अॅड. उज्वल निकम यांची नेमणूक व्हायला हवी,हे देशमुख कुटुंब साधंभोळं कुटुंब आहे, पण मी लक्ष ठेवून आहे असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
देशमुख कुटुंबीयांशी माझी आज चर्चा काही नाही झाली, मी दवाखान्यातच होतो, आज सुट्टी झाली आता त्यांची भेट झाली आहे. पण हे प्रकरण आम्ही दाबू देणार नही, समाज पाठीशी आहे असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे कारवाई कधी होईल. उज्वल निकम यांची नियुक्ती झाली का ? मोबाईल कधी मिळणार?, आम्हाला तर शंका आहे धनंजय मुंडेच्या घरी मोबाईल ठेवला का? असा आरोप जरांगे पाटील केला आहे.
फरार आरोपीला मुंडेनी लपवून ठेवला असेल
गाडीवाला कुठं आहे? फरार आरोपी इथंच असायला पाहिजे बीड, नगर, बुलढाणा- सिन्नर या भागात असेल. त्याला धनंजय मुंडे यांनी लपवून ठेवला असेल…गाडीवाला कुठं आहे? देशमुख यांना धमकी देणार कुठे आहेत, घर देणारा, पैसे देणाऱ्यांना सहआरोपी केलं का? असाही सवाल जरांगे यांनी केला आहे. शिवाजी नगर पोलिस स्टेशनच्या इन्स्पेक्टरची चौकशी झाली का?, डॉक्ट्ररांची चौकशी केली का ? मुख्यमंत्री काय करत आहेत? हे सर्वांना माहित आहे, देशमुख कुटुंबियांनी विश्वास ठेवला आहे. त्यांचा गैरफायदा घेऊ नका देशमुख कुटुंब भोळभाबडं आहे, आरोपी सुटू देऊ नका असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.
फोन धनंजय मुंडेलाच केला का?
करमाड्या ( कराड ) 302 मध्ये आलाय का?, मोक्क्यात आलाय का? , 120 ब मध्ये तो आलाय का?, मला शंका आहे. यामध्ये एका बड्या नेत्याला फोन गेला होता, तो बडा नेता कोण आहे आम्हाला कळू द्या जरा…विष्णू चाटे याने एका बड्या नेत्याला फोन केला होता, मग धनंजय मुंडेलाच केला का? विष्णू चाटेनं जो मोबाईल वापरला, तो मोबाईल कुठं आहे? धनंजय मुंडेचे सीडीआर काढले का? अशी प्रश्नांची सरबत्ती जरांगे यांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List