मौनी अमावस्येला तिसऱ्या ठिकाणीही चेंगराचेंगरी झाली; प्रत्यक्षदर्शीचा खळबळजनक दावा

मौनी अमावस्येला तिसऱ्या ठिकाणीही चेंगराचेंगरी झाली; प्रत्यक्षदर्शीचा खळबळजनक दावा

प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात झालेल्या दुर्घटनांबाबत सरकारकडून लपवाछपवी करण्यात येत असल्याची शंका वर्तवण्यात येते. तसेच या दुर्घटनांमध्ये मृतांची संख्या जास्त असण्याच अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच आता मौनी अमावस्येला म्हणजेच 29 जानेवारी रोजी तिसऱ्या ठिकाणीही चेंगराचेंगरी झाल्याचा खळबळजनक दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. या दुर्घटनेत 5 ते 7 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सेक्टर २१ च्या संगम लोअर रोडवर ही चेंगराचेंगरी झाल्याचे समजते.

महाकुंभात मौनी अमावस्येच्या दिवशी दोन ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याचे उघड होत आहे. मात्र, आता तिसऱ्या ठिकाणीही चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही प्रत्यक्षदर्शींना याबाबतची माहिती दिली आबे. सेक्टर 21 च्या संगम लोअर रोडवर ही चेंगराचेंगरी झाली असून त्यात 5 ते 7 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींचा दावा आहे की 29 जानेवारी रोजी झालेली ही तिसरी चेंगराचेंगरी होती. महाकुंभदरम्यान फक्त एका ठिकाणी चेंगराचेंगरी झाली नसून तीन ठिकाणी चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या या दाव्यानंतर प्रशासन नेमके काय लपवत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहेत.

मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीचे आकडे सरकार आणि प्रशासनाने जाहीर केले आहेत, परंतु त्याबद्दल अनेक प्रश्न आणि अनेक दावे केले जात आहेत. सेक्टर 21 मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 5 ते 7 जणांचा मृत्यू झाल्याची भीती प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे. या घटनेवेळी तेथे एकही पोलिस उपस्थित नव्हता. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की पहिली चेंगराचेंगरी आणि त्याची माहिती सर्वांना मिळाली आहे. मात्र, इतर घटनांची माहिती मिळाली नाही. दुसरी चेंगराचेंगरी झुंसी येथे झाली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच चेंगराचेंगरीची तिसरी घटना प्रयागराजमधील सेक्टर 21 संगम येथे घडली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List