BMC Budget 2025 : महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये घट, प्रत्येक वर्षी 4500 कोटींचा तोटा; 4 फेब्रुवारीला सादर होणार BMC चं अर्थसंकल्प

BMC Budget 2025 : महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये घट, प्रत्येक वर्षी 4500 कोटींचा तोटा; 4 फेब्रुवारीला सादर होणार BMC चं अर्थसंकल्प

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प केलं असून यात शेतकरी, मध्यमवर्गीय यांच्यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. केंद्रीय अर्थसंकल्पावर जनसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यातच आता मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्पाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 4 फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेचं अर्थसंकल्प सादर केलं जाणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून निवडणूक न झाल्याने सध्या प्रशासक म्हणून पालिकेचं कामकाज पाहणारे आयुक्त भूषण गगराणी हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

बीएमसीच्या मुदत ठेवींमध्ये घट

20 वर्षांपूर्वी तोट्यात असणारी मुंबई महानगरपालिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सत्तेत आल्यानंतर मुदत ठेवींमध्ये मोठी वाढ झाली. शिवसेनेच्या 25 वर्षांच्या सत्ताकाळात तब्बल पालिका फायद्यात येऊन मुदत ठेवी तब्बल 92 हजार कोटींवर गेल्या होत्या. मात्र महायुती सरकारच्या कार्यकाळात ठेवी झपाट्याने घटत आहेत.

न्यूज 24 ने दिलेल्या वृत्तानुसार, वर्ष 2022 मध्ये महापालिकेची मुदत ठेव 91,690 कोटी रुपये होती, जी वर्ष 2023 मध्ये 5 हजार कोटींनी कमी होत 86410 कोटी रुपये आणि वर्ष 2024 मध्ये कमी होऊन 81 हजार कोटी रुपये झाली आहे. याशिवाय पालिकेने मुंबईत 500 स्क्वेअर फूटापर्यंतच्या घरांवरील प्रॉपर्टी टॅक्स माफ केल्याने प्रत्येक वर्षी 4500 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाकुंभ चेंगराचेंगरीबाबत सरकारची लपवाछपवी? भंडाफोड करणाऱ्या रिपोर्टरला धक्काबुक्की महाकुंभ चेंगराचेंगरीबाबत सरकारची लपवाछपवी? भंडाफोड करणाऱ्या रिपोर्टरला धक्काबुक्की
प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात अमृतस्नानाच्या पर्वणीदरम्यान चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेबाबत सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात येत नव्हती. अखेर...
ग्रामीण भागात एसटी रुबाबात धावणार, नव्या गाड्यांच्या समावेशाने लांबपल्ल्याचा प्रवास सुखकर होणार
खुशी कपूरच्या मिस्ट्री मॅनचा खुलासा?; कोण आहे अभिनेत्रीच्या स्वप्नांचा राजकुमार?
BMC Budget 2025 : महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये घट, प्रत्येक वर्षी 4500 कोटींचा तोटा; 4 फेब्रुवारीला सादर होणार BMC चं अर्थसंकल्प
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल – नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 8 नक्षलवाद्यांचा खात्मा
फक्त पोकळ घोषणा, मोठ्या वल्गना…शेतकरी, कृषीक्षेत्रासाठी अर्थसंकल्पात काहीही नाही; राजू शेट्टींचा हल्लाबोल
Crime News – मानवतेला काळीमा, मेव्हणीवर बलात्कार करून मृतदेह जाळला