Crime News – मानवतेला काळीमा, मेव्हणीवर बलात्कार करून मृतदेह जाळला
मेव्हणीवर सामुहीक अत्याचार करत तिची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच पीडितेचा मृतदेह जाळून टाकण्यात आला आहे. या खळबळजनक घटनेमुळे उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील बवाना गावामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपी आशिषला अटक केली असून अन्य दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार 23 जानेवारी रोजी पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती. तपासात माहिती मिळाली की, आशिष आणि पीडित तरुणीमध्ये अनैतिक संबंध होते. तसेच तो तिच्यावर लग्न करण्यासाठी वारंवार दबाव टाकत होता. तरुणीला फुस लावत आशिषने शुभम आणि दिपक या मित्रांच्या मदतीने घरापासून लांब नेले आणि तिच्यावर आळीपाळीने सामुहीक अत्याचार केला. तसेच त्यांनी तिची गळा दाबून हत्या केली आणि पुरावा मिटवण्यासाठी मृतदेह जाळण्यात आला. पोलिसांनी मुख्य आरोपी आशिषला बेड्या ठोकल्या आहेत. परंतु शुभम आणि दीपक फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List